मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Latur: अपरात्री घरात घुसणं बेतलं जीवावर; तरुणासोबत जे घडलं ते वाचून हादराल

Latur: अपरात्री घरात घुसणं बेतलं जीवावर; तरुणासोबत जे घडलं ते वाचून हादराल

Crime in Latur: लातूर जिल्ह्यातील औसा याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री अपरात्री दुसऱ्यांच्या घरात शिरणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

Crime in Latur: लातूर जिल्ह्यातील औसा याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री अपरात्री दुसऱ्यांच्या घरात शिरणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

Crime in Latur: लातूर जिल्ह्यातील औसा याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री अपरात्री दुसऱ्यांच्या घरात शिरणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

  • Published by:  News18 Desk

लातूर, 23 डिसेंबर: लातूर (latur) जिल्ह्यातील औसा (Ausa) याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री अपरात्री दुसऱ्यांच्या घरात शिरणं (Young man enters in neighbour's house) एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. रात्री बाराच्या सुमारास गुपचूप घरात शिरल्याच्या कारणातून घरातील मंडळींनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण (young man beaten by family) केली आहे. ही मारहाण इतकी भयावह होती की संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू (death) झाला आहे. या प्रकरणी घरातील चौघांविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक (4 Accused arrested) केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

विनोद पंढरी बनसोडे असं हत्या झालेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत विनोद हा औसा तालुक्यातील एरंडी येथील रहिवासी आहे. 21 डिसेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास मृत विनोद हा हनुमंत विश्वंभर कोल्हाळे यांच्या घरात अनधिकृतपणे शिरला होता. छुप्प्या पद्धतीने घरात शिरल्याने कोल्हाळे कुटुंबीयांनी विनोदला जाब विचारला. यातून विनोदची कोल्हाळे कुटुंबीयांसोबत वादावादी झाली.

हेही वाचा-जेवण नीट न बनवल्याने पतीची सटकली; उच्चशिक्षित पत्नीच्या पाठीला घेतला कडकडून चावा

तू अपरात्री आमच्या घरात का आलास असा जाब विचारत कोल्हाळे कुटुंबानं विनोद बनसोडे याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत विनोदचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत विनोदचे 62 वर्षीय वडील पंढरी सोपान बनसोडे यांनी औसा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-कोल्हापुरात तिघांनी जीवलग मित्राचा केला घात, मृतदेह पाहून पोलिसांचा उडाला थरकाप

पंढरी बनसोडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हनुमंत विश्वंभर कोल्हाळे, अनुराधा हनुमंत कोल्हाळे, वाघंबर विनायक कोल्हाळे आणि दिगंबर विनायक कोल्हाळे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. मृत विनोद नेमक्या कोणत्या कारणातून अपरात्री कोल्हाळे यांच्या घरात शिरला याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा सविस्तर तपास औसा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Latur, Murder