जळगाव, 9 नोव्हेंबर : समर्थक आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी राजकीय नेते सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. मात्र काहीवेळा हेच समर्थक तर कधी संबंधित नेत्याला नेत्याला ट्रोल करण्यासाठी विरोधक या नेत्यांच्या नावाने बनावट अकाऊंट सुरू करतात. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या बाबतही अशाच काहीसा प्रकार घडला आहे.
एकनाथ खडसे यांच्या नावाने एक ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. याबाबत खडसे यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून माहिती देत कारवाईचा इशारा दिला असून @EknathGKhadse हे अधिकृत अकाउंट असल्याचे सांगितलं आहे.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने @KhadseSpeaks हे ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे, जे अनधिकृत आहे. याच्या संदर्भात रीतसर ट्विटरकडे तक्रार दाखल केली आहे. माझे अधिकृत अकाऊंट @EknathGKhadse हे असून त्याला 2 लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.'
#खोडसाळपणा... कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने @KhadseSpeaks हे ट्विटर अकाउंट सुरु केले आहे, जे #अनधिकृत आहे. याच्या संदर्भात रीतसर ट्विटरकडे रिपोर्ट आणि तक्रार दाखल केली आहे.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2020
माझे #अधिकृत_अकाउंट @EknathGKhadse हे असून त्याला २ लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत. कृपया याची नोंद घ्यावी. pic.twitter.com/YOlSTC3fQy
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधल्यानंतर ते विविध तालुक्यांमध्ये जात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. खडसे यांच्या उपस्थित त्यांचे जुने सहकारी देखील भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.