रस्त्यावर नोटांचा ढीग लुटण्यासाठी लोकांची उडली झुंबड, पण पुढे जे घडलं...

रस्त्यावर नोटांचा ढीग लुटण्यासाठी लोकांची उडली झुंबड, पण पुढे जे घडलं...

बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होत्या. मग का ?,

  • Share this:

21 आॅगस्ट : रस्त्यावर जर तुम्हाला सुट्टे नाणे जर सापडले तर ते घेण्याचा मोह आवरणार नाही...त्याच जागी जर नव्या 2000 आणि 500 नोटांचा ढीग रस्त्यावर आढळला तर ?, साहजिकच एक-दोन नोटा तर सहज खिश्यात घालणार...पण असाच मोह केल्यामुळे औरंगाबादकरांची चांगलीच फजिती झालीये.

घडलेली हकीकत अशी की, औरंगाबाद चिकलठाणा एमआयडीसी वसहतीमध्ये भररस्त्यावर नोटांचा ढिग पाहण्यास मिळाला. बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होता. मग का ?, हा हा म्हणता बातमी वाऱ्या सारखी पसरली. नोटांचा ढीग पाहण्यासाठी आणि नोटा लुटण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. चक्क 2 हजार आणि 500 शेच्या नोटा बघून अनेकांना मोह आवरला नाही. मग काय लोकांनी भरभरा नोटा घेण्यास सुरुवात ही केली. मात्र लोकांचा अचानक हिरमोड झाली. कारण त्या नोटा नकली होत्या. नकली म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यासाठी ज्या नोटा वापरतात ना त्या नोटा होत्या.

बरं आता अदाशा सारख्या नोटा तर घेतल्या पण त्या नकली असल्यामुळे नोटा उचलणाऱ्यांचा चांगलाच 'पोपट' झाला. नकली नोटा बघून खजील होण्याशिवय पर्याय नव्हता. मात्र आपला अपमान होईल म्हणून फसलेले लोक इतरांना काही न सांगता गुपचूप निघून जात होते. लोकांची फजिती झालेली पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली.

बरं हे एवढ्यावर थांबलं नाही. याची खबर पोलिसांना लागली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा नकली नोटा असल्याचं कळलं, त्यांनी डोक्याला हात मारला. पण

या खेळण्यातील नोटा छापल्या कुणी याचा शोध घेण्याचे काम आता पोलिसांच्या मागे लागलंय.

First published: August 21, 2017, 8:38 PM IST

ताज्या बातम्या