मुंबई, 31 ऑक्टोबर: कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी सध्या तरी मास्क वापरणे हाच एकमेव उपाय आहे. त्यात 'सरकार मान्य' N95 मास्कच वापरणेच योग्य असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता हे सरकार मान्य M95 मास्कच बनावट येत असल्याचं उघड झालं आहे.
मुंबई पोलिसांनी असाच एक मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. मुंबई पोलिसांनी बनावट 'सरकारमान्य' N95 मास्कचा कारखाना उद्धवस्त केला आहे.
हेही वाचा..धक्कादायक! विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं तरुणीची आत्महत्या
कोरोनासारख्या महामारीपासून स्वत: च रक्षण करण्यासाठी आपण मेडिकलमध्ये जावून चांगल्या क्वालिटीचा मास्क घेतो. विशेष करुन अशा काही नावाजलेल्या मास्क निर्मात्या कंपन्या आहेत. आपण त्यांचं मास्क डोळे झाकून घेतो. पण आता अशा बड्या कंपन्यांचे बनावट मास्कच बाजारात आल्यानं खळबळ उडाली आहे. ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान तर होतंच आहे, पण कोरोनापासून तुमचा बचाव देखील होत नसल्याचं समोर आलं आहे.
मुंबईत मोठा काळाबाजार उघडकीस..
मुंबईतील लोअर परेल भागात विनस सारख्या प्रतिष्ठित कंपनीचं बनावट फेस मास्क विकलं जात आहे. तसेच याच भागात या प्रतिष्ठित कंपन्यांच्या फेस मास्कचा मोठा साठा देखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे 22 लाख रुपयांचे बनावट मास्क जप्त करण्यात आले आहेत. मात्र, हा साठा म्हणजे बनावट फेस मास्कच्या हिम नगाचा एक छोटासा भाग असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान समोर आली आहे. कारण हे बनावट मास्क बनवणारा एक मोठा कारखानाच आहे. या कारखान्यातून देशभरात कोट्यावधी रुपयांचे बनवाट मास्क पुरवले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
बनावट फेस मास्क प्रकरणी मुंबई पोलिसांनी सफदर हुसेन याला मुंबईतून तर मोहम्मद सोहेल याला उत्तर प्रदेश राज्यातील गाझीयाबाद येथून अटक केली आहे. तर N95 हे V-4400, NIOSH, TC-84A- 8126, N95 vlk VENUS या कंपन्यांचे बनावट लोगो, बनावट मास्क, मास्क करता लागणारे प्लास्टिक आणि दस्ताऐवज पोलिसांनी जप्त करुन बनावट मास्क बनवणारा कारखाना सील केल्याची माहिती मुंबई पोलीस जन संपर्क अधिकारी एस चैतन्य यांनी दिली आहे.
हेही वाचा...उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणं अयोग्य, संजय राऊतांचा टोला
उत्तर प्रदेश येथून अटक केलेल्या मोहम्मद सोहेल हा या घोटाळ्याचा मुख्यसुत्रधार आहे ज्याचा शोध मुंबई पोलिस गेली कित्येक महिन्यांपासून करत होती. तर देशभरातील अनेक मोठं मोठे फेस मास्क डिलर आणि मेडीकलवाले हे सोहेलच्या संपर्कात होते. ज्यांची चौकशी आता मुंबई पोलिस करणार आहेत. ज्यामुळे सामान्य माणसांच्या जीवाशी खेळणारे गजाआड होतील आणि कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस येईल. मुंबई पोलिस गुन्हे शाखा क्रमांक 3 चे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक खोत, पोलिस निरीक्षक नितिन पाटील, सपोनि गजानन भारती, पोलिस नाईक शिवाजी जाधव, पोलिस शिपाई भास्कर गायकवाड यांनी ही धडकेबाज कामगिरी केली आहे.