वसई, 6 नोव्हेंबर : जादूटोणाच्या नावाखाली नागरिकांना गंडवणाऱ्या भोंदू बाबाला वसई पोलिसांनी अटक (Fake baba arrested by Vasai Police) केली आहे. या भोंदू बाबाने आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक (fake godman cheated with many women) केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने वसई, विरार, नालासोपारा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक केली आहे. अखेर या बोंदूबाबाचा पर्दाफाश झाला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वसई पूर्व मध्ये राहणाऱ्या काही महिला या भोंदू बाबाच्या जाळयात अडकल्या. माझ्या अंगात काली माता येते, तुमच्या घरी कोण आजारी असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील त्या मी सर्व दूर करून देणार असे आश्वासन देऊन भोंदू बाबाने महिलांना आपल्या भोंदूगिरीच्या जाळत अडकवले.
असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
नूर -अली- सलमाने (32) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. या भोंदू बाबाने 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान एका महिलेच्या घरी पूजा ठेवली. पूजा दरम्यान तुमच्या जवळ जेवढे सोनं असेल ते पूजा विधीमध्ये आणून एका कपड्यात बांधून ठेवा. जितके जास्त सोनं तुम्ही आणाल तितकेच तुमच्या समस्या दूर होतील असे सांगून हा भोंदू बाबा महिलांना फसवत असे. बांधून ठेवलेल्या सोन्याला 7 दिवस हात नका लावू असे सांगून हातचलाकीने भोंदू बाबाने कपड्यात असलेले सोने बदलून त्यात दगड भरून ठेवले. यानंतर तो पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माणिकपूर पोलिसांनी सापळा रचून या भोंदूगिरी करणाऱ्या बाबाला अटक केली.
नांदेडमध्ये दत्ताचा अवतार सांगत फसवणूक, डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा
स्वत:ला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे सांगून भक्तांना गंडवणाऱ्या बाबाला नांदेडमध्ये गेल्या महिन्यात अटक करण्यात आली आहे. गुप्तधन, कुटुंबाच्या भरभराटीसाठी केलेल्या यज्ञात भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करण्यात हा भोंदूबाबा तरबेज होता. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे कपिले महाराज ऊर्फ विश्वजित कपिले या भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
या बाबाने डोंबिवली आणि पुण्यासह अनेक उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर बाबासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबासह तीन जणांना माहूर पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.