फेक फॉलोअर्स रॅकेट: क्रिकेट कॉमेंटेटर आणि रेडिओ जॉकीला मुंबई पोलिसांचा समन्स

फेक फॉलोअर्स रॅकेट: क्रिकेट कॉमेंटेटर आणि रेडिओ जॉकीला मुंबई पोलिसांचा समन्स

मुंबई क्राइम ब्रॅंचने सोशल मीडिया इंफ्लूएंसर अंकिता अरोरो आणि अभिनेत्री अशी शर्मा हिला देखील चौकशीसाठी बोलावलं होतं.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै: सोशल मीडियावर (Social media) फेक फॉलोअर्स (fake followers) प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता क्रिकेट कॉमेंटेटर गौरव कपूर आणि रेडिओ जॉकी रोशन अब्बासला याला समन्स बजावले आहेत. दोघांनाही आज (बुधवारी) चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं आहे.

हेही वाचा...बॉलिवूड गायिकेचं बनावट अकाऊंट, पैसे देवून फॉलोअर्स वाढवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश?

दरम्यान, फर्जी फॉलोअर्स प्रकरणी या आधी मुंबई पोलिसांनी Chtrbox चे सीईओ प्रणय स्वरूप यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सूत्रांनुसार, मुंबई क्राइम ब्रॅंचने (Mumbai Police Crime Branch) 28 जुलैला प्रणयला आपल्या 30 हजार ग्राहकांच्या यादीसह चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, तरीही प्रणय चौकशीला आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

प्रणय स्वरूप याने कोरोनामुळे ऑफिसमध्ये स्टाफ न नसल्याने डाक्युमेंट्स उपलब्ध होऊ शकले नसल्याचं कारण दिलं आहे. दरम्यान, गेल्या शनिवारी देखील मुंबई क्राइम ब्रॅंचने भादंवि कलम 160 नुसार प्रणयची चौकशी केली होती. आपले 30 हजार ग्राहक असल्याची माहिती प्रणय स्वरूप याने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांना प्रणयला आपल्या 30 हजार ग्राहकांच्या यादीसह बुधवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तसेच प्रणय स्वरूपला त्याच्या कंपनीचा गेल्या 4 वर्षांचा उत्पन्नाचा (इनकम प्रुफ) तपशील मागितला आहे.

प्रणय स्वरूप याने कंपनी Chatrbox च्या ऑफिशियल वेबसाइटवर त्याच्या क्लाइंट्सची संख्या 3.5 लाखांहून जास्त असल्याचं सांगितलं आहे. मात्र, क्राइम ब्रॅंचला दिलेल्या माहितीत प्रणयने हा आकडा केवळ 30 हजार असल्याचं म्हटलं आहे. यावरून प्रणयवर पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे.

हेही वाचा...कर्मचाऱ्यांना खूशखबर! पगारातून कपात केलेली रकमेबाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय

याआधी, मुंबई क्राइम ब्रॅंचने सोशल मीडिया इंफ्लूएंसर अंकिता अरोरो आणि अभिनेत्री अशी शर्मा हिला देखील चौकशीसाठी बोलावलं होतं. अंकिता आणि अशी या दोन्ही कासिफ मंसूर याच्या कथित ग्राहक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कासिफ मंसूर हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तो www.amvsmm.com वेबसाइट चालवतो आणि त्याची  कंपनी बड्या लोकांना सोशल मीडियावर फेक फॉccलोअर्स उपलब्‍ध करून देत होती.

Published by: Sandip Parolekar
First published: July 29, 2020, 12:55 PM IST

ताज्या बातम्या