बोगस पदवी, पीएचडी सर्टीफिकेट देणाऱ्या भामट्याला अटक

बोगस पदवी, पीएचडी सर्टीफिकेट देणाऱ्या भामट्याला अटक

आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या नावाने तो बोगस पदवी प्रमाणपत्र देत होता.

  • Share this:

सातारा, 30 मार्च : कोणत्याही शाखेच्या बोगस पदवी, पीएचडी सर्टिफिकेट देणाऱ्या व्यक्तीला साताऱ्यातील कोरेगाव पोलिसांनी अटक केलीय. विठ्ठल मदने असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या नावाने तो बोगस पदवी प्रमाणपत्र देत होता. बनावट ऑनलाईन वेबसाईटच्या मदतीनं विठ्ठल मदने बोगस पदव्या विकत होता. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास कुचेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर विठ्ठल मदनेला अटक करण्यात आलीये.

विकास कुचेकर यांनी विठ्ठल मदनेशी ईमेलनं संपर्क साधला होता. यानंतर कोणतीही परीक्षा न देता कोणत्याही शाखेची पदवी आपण देऊ शकतो, असं विठ्ठलनं विकास यांना सांगितलं होतं.

First published: March 30, 2018, 11:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading