घरात बसून बापलेकं छापत होते 200 रुपयांच्या बनावट नोटा, असा झाला पर्दाफाश

घरात बसून बापलेकं छापत होते 200 रुपयांच्या बनावट नोटा, असा झाला पर्दाफाश

विशेष म्हणजे कमी मोबदल्यात जास्त दराच्या नोटा ह्या ग्राहकाला दिल्या जात होत्या.

  • Share this:

धुळे, 28 ऑक्टोबर: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्घवस्त केला आहे. पोलिसांनी छापा टाकून 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या बापलेकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणला आहे. पोलिसांनी कळमसरे गावात कारवाई करत एका घरातून नोटा छापण्याचे साहित्य, कॉम्पुटर, प्रिंटर्स तसेच 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

हेही वाचा... स्वबळावर भगवा फडकवणार! हे मी 30 वर्षांपासून ऐकतोय, शरद पवारांचा सेनेला टोला

शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात बनावट नोटा छापल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. दरम्यान या माहितीच्या आधारे LCB पथक आणि  शिरपूर पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी संशयित संतोष बेलदार ने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेत अटक केली. यावेळी पोलिसांनी घराची झडती घेतली असता आरोपी संतोष बेलदारचे वडील बेसिनमध्ये बनावट नोटा जाळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या. बनावट नोटा प्रकरणी चौघां विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोष बेलदारसह दोघांना अटक केली आहे.

संतोष बेलदार हा त्याचा शालक मंगल बेलदारच्या मदतीने बनावट नोटा छापून वितरित करत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे कमी मोबदल्यात जास्त दराच्या नोटा ह्या ग्राहकाला दिल्या जात होत्या. दरम्यान बनावट नोटा प्रकरणातले दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा...‘पंकजा मुंडे चांगलं काम करत आहेत’ पवारांच्या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण

आरोपींनी धुळे जिल्ह्यासह आणखी कुठे कुठे बनावट नोटा चलनात आणल्या आहेत. याचाही शिरपूर पोलीस तपास करत आहे. बनावट नोटांचं मोठं रॅकेट बाहेर येण्याचा संशय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलिसांनी वर्तवला आहे. बनावट दारू, गांजा, अंमली पदार्थांच्या तस्करीनंतर आता थेट बनावट नोटांचा मिनी कारखाना उघडकीस आल्याने शिरपूर तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 28, 2020, 4:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या