शंभराच्या बनावट नोटा चलनात.. जळगावात नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

शंभराच्या बनावट नोटा चलनात.. जळगावात नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमआयडीसी पोलिसांनी जळगावात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

  • Share this:

राजेश भागवत, (प्रतिनिधी)

जळगाव, 1 ऑगस्ट- एमआयडीसी पोलिसांनी जळगावात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दोघांनी अटक करून त्यांच्याकडून शंभर रुपये मुल्य असलेल्या 74 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा, नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, तांबापूर परिसरात दोन तरुण कलर झेरॉक्स वापरून बनावट नोटा बनवत असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून तांबापूर परिसरातील एका घरावर छापा टाकला. शेख रईस शेख रशीद आणि अहमद खान अफजलखान या दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून बनावट नोटांनी भरलेली पिशवी हस्तगत केली आहेय. यात शंभर रुपये मुल्य असलेल्या 74 हजार 300 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. यासाठी वापरण्यात येणार साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.

चलनात आणल्या शंभरच्या बनावट नोटा..

गेल्या काही दिवसांपासून या दोघांनी शंभरच्या बनावट नोटा चलनात आणलेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी येत्या काही काळात देखील या 74 हजार 300 रुपयेच्या नोटा चलनात आणणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यात अतिरिक्त आणखी कुठे या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत का, यात मोठे रॅकेट आहे का, यासंदर्भात एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. दोन्ही आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बनावट नोटा चलनात आल्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत.

कोल्हापुरात पूरग्रस्तांमध्ये हाणामारी, काय घडलं नेमकं पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 17, 2019, 6:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading