रत्नागिरीतही एक राम रहिम बाबा; महिलेला शिवीगाळ केल्याची तक्रार

रत्नागिरीतही एक राम रहिम बाबा; महिलेला शिवीगाळ केल्याची तक्रार

रत्नागिरीतील या बाबाचा प्रताप आता उघड झालाय. या बाबाचं खर नाव श्रीकृष्ण पाटील आहे. हा बाबा महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो.

  • Share this:

रत्नागिरी,21 सप्टेंबर: रत्नागिरीत आता दुसरा राम रहीम बाबा निर्माण झालाय. पूर्वी पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या या बाबाविरूद्ध अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याबद्दल एका महिलेने तक्रार केली आहे. या बाबाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रत्नागिरीतील या बाबाचा प्रताप आता उघड झालाय. या बाबाचं खर नाव श्रीकृष्ण पाटील आहे. हा बाबा महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो. हा बाबा सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनलाय. या बाबाच्या विरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रत्नागिरी सारख्या मोक्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना लुबाडण्याचं काम हा करत होता. रत्नागिरीतील झरेवाडी येथे या बाबाचा मठ देखील आहे. दर गुरूवारी बाबाची वारी देखील असते. स्वत:ला हा स्वामी समर्थांचा अवतार समजायचा. हा बाबा स्वत:ला देव म्हणवून घेतो.

या बाबाविरूद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीने देखील या बाबाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

आता या भोंदू बाबाविरूद्ध काय कारवाई होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे

First published: September 21, 2017, 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading