मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं पण.., अमित शहांनी केला मोठा खुलासा

फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं पण.., अमित शहांनी केला मोठा खुलासा

2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं.

2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं.

2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं.

पुणे, 19 डिसेंबर :  '2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. पण शिवसेना पलटली. मी खोटं बोललो म्हणतात ठीक आहे, ते मान्य आहे. पण, तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला, हिंदुत्व सोडलं' अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackery) टीकास्त्र सोडलं.

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच इथं भाजप बूथ कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी अमित शहांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

'ही तीन चाकी रिक्षा बंद पडली आहे. चाकात हवा नाही. या सरकार च्या हातात राज्य कसं चालेल? हे निक्कमी सरकार आहे. शिवसेना म्हणते,' सत्ता मेरा जन्मसिद्ध अधिकार किसी भी तरह लेकर रहेंगे' तुम्हाला आव्हान आहे, निवडणुकीला सामोर जा, तिघांविरोधात लढा. मग बघा तरी काय अवस्था होते, असं थेट आव्हानच अमित शहांनी सेनेला दिलं.

पुढील आठवड्यात बाजाराची दिशा कशी असेल? 'हे' घटक ठरतील महत्वपूर्ण

'यांना ऐकायला अडचण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल स्वस्त करायला सांगितलं यांनी दारू स्वस्त केली. उद्धव ठाकरे सरकार उत्तर द्या, हे वसुली सरकार आहे, अशी टीकाही अमित शहांनी केली.

'मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बूथ कार्यकर्ता म्हणून केली . साबरमती विधानसभेचा 1981 चा बूथ कार्यकर्ता होतो. ही एकमेव पार्टी जिथे बूथचा अध्यक्ष पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. अनेकदा हाताला बोचनाऱ्या थंडीत कमळ रंगवलं, सतरंज्या टाकल्या पण अध्यक्ष म्हणून निवडताना अस कुणी म्हटलं नाही. 1950 मध्ये जनसंघाच्या जन्माच्या वेळी काय झालं. 70 वर्षात जगातलं सगळ्यात मोठी राजकीय संघटना आहे. जिथे कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं तिथे सरकार आली. प्रत्येक मतदारासमोर जाताना छाती मोठी करून जा तुमच्या नेतृत्वाने कुठलही चुकीचं काम केलेलं नाही, असंही अमित शहांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात 12 लाख कोटीचे घोटाळे झाले. आम्ही 370 कलम हटवलं. काशी कॉरिडॉर बनवलं, राममंदिर पण बनवलं, असंही अमित शहा म्हणाले.

First published: