आदित्यनाथांनी 'करून दाखवलं', आता फडणवीस करतील का ?

आदित्यनाथांनी 'करून दाखवलं', आता फडणवीस करतील का ?

युपीतलं योगी सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 36 हजार कोटी देत असेल तर मग महाराष्ट्रातलं देवेंद्र सरकार 30 हजार कोटी का देऊ शकत नाही

  • Share this:

04 एप्रिल : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा धडाकेबाज निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार युपीतल्या 2.15 कोटी शेतकऱ्यांचं प्रत्येकी एक लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. युपीतल्या या कर्जमाफीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार कर्जमाफीचा निर्णय नेमकं कधी जाहीर करणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश सरकारची सूत्र हाती घेताच कर्जमाफीचा पहिलाच धडाकेबाज निर्णय घेतलाय. कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलाय...उत्तरप्रदेशातल्या दोन कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांचं प्रत्येकी एक लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे...त्यासाठी 36 हजार कोटींची तरतूद उत्तरप्रदेश सरकारतर्फे केली जाणार आहे...योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय. पण युपीतल्या या कर्जमाफीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय. भाजप सरकार युपीत कर्जमाफी करू शकत असेल तर मग महाराष्ट्रात कधी ? असा खडा सवाल विरोधकांकडून आत्तापासूनच विचारला जातोय.

महाराष्ट्रात तसंही सर्व विरोधी पक्षांनी कर्जमाफीच्या मुद्यावर प्रथमच एकत्र येऊन संघर्षयात्रा काढली होती. या संपूर्ण संघर्षयात्रेदरम्यान विरोधकांनी कर्जमाफीचाच मुद्दा लावून धरलाय. महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी अंदाजे 30हजार कोटींची आवश्यकता आहे.

युपीतलं योगी सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 36 हजार कोटी देत असेल तर मग महाराष्ट्रातलं देवेंद्र सरकार 30 हजार कोटी का देऊ शकत नाही, असा प्रश्न विरोधकांकडून यापुढेही वारंवार उपस्थित केला जाणार यात शंका नाही

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर किती आहे ?

- एकूण कर्जदार शेतकरी - एक कोटी 36 लाख

- खरीप कर्जदार - 48 लाख 31 हजार

- कर्जवाटप 33 हजार 195 कोटी

- रब्बी कर्जदार - 4 लाख 35 हजार

- कर्जवाटप 3,771 कोटी

- जिल्हा बॅंक थकबाकी - 9 हजार 500 कोटी

- राष्ट्रीयीकृत बॅंकांची थकबाकी (अंदाजे) - 12 हजार कोटी

First published: April 4, 2017, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading