FACT CHECK : महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवणार, स्वत: आरोग्यमंत्र्यांनीच दिले संकेत?

FACT CHECK : महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवणार, स्वत: आरोग्यमंत्र्यांनीच दिले संकेत?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच याबाबतचे संकेत दिल्याच्याही बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. अशातच लॉकडाऊनच्या कालावधीबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील लॉकडाऊन वाढवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच याबाबतचे संकेत दिल्याच्याही बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत.

'15 एप्रिलपर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे,”असं राजेश टोपे यांनी म्हटल्याचा दावा करण्यात येत आहे. तसंच यातून टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिल्याचंही बोललं जात आहे.

एकीकडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात जोरदार चर्चा असतानाच आरोग्यमंत्र्यांसंबंधित ही बातमी वेगाने पसरल्यानंतर 'न्यूज18 लोकमत'ने थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला. मात्र यावेळी टोपे यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात आपण कोणतेही भाष्य केलं नसल्याचं सांगत सर्व चर्चा खोडून काढल्या आहेत.

'मी असं कुठेही कधीही बोललो नाही. याचा सर्वस्वी निर्णय देशपातळीवर केंद्र सरकार आणि राज्य पातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतली. तुर्तास असं काहीच नाही,' असा खुलासा राजेश टोपे यांनी केला आहे.

First Published: Apr 4, 2020 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading