FACT CHECK : लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश?

FACT CHECK : लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश?

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात माहिती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केली जाऊ लागली.

  • Share this:

ठाणे, 29 मे : कोरोना व्हायरसने देशात धडक दिली. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने देशाव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र त्यानंतर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात माहिती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केली जाऊ लागली. यातच काही समाजकंटकांनी हात धुवून घेतले आणि अफवा पसरवण्यास सुरुवात केली. अशीच एक अफवा ठाणे परिसरात पसरली होती. मात्र त्याबाबत आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे.

'सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश, शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक, जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असल्याची माहिती सोशल मीडियामध्ये पसरवण्यात आली. मात्र त्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाकडून असे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत. तसेच जिल्हा प्रशासनाकडून सदर वृत्त प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तरी सदर बातमीमध्ये तथ्य नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती, असा खुलासा ठाण्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांनी केला आहे.

ठाण्यात काय आहे कोरोनाची स्थिती?

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या 2750 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे, शुक्रवारी 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1177 एवढी झाली आहे. तर अजूनही 1494 रुग्ण कोरोनाविरोधातील लढाई लढत आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 30, 2020, 12:10 AM IST

ताज्या बातम्या