गोविंद वाकडे, 13 जून : कामाच्या दगदगीत अनेकांना पंढरपूरची वारी करता येत नाही. अशा लोकांसाठी फेसबुकवर ऑनलाईन वारी सुरू करण्यात आलीये. यंदाची वारी महिलांना समर्पित करण्यात आलीये.
आषाढी वारीसोहळ्याच्या तयारीची लगबग सुरू झालीये. देहू आळंदीतल्या काही तरुणांचीही लगबग सुरू झालीये. त्यांचीही वारीचीच लगबग आहे, पण ही वारी आहे सोशल मीडियावरची.गेल्या सात वर्षांपासून काही तरुणांनी फेसबुक वारी सुरू केलीये. ज्यांना प्रत्यक्ष आषाढी वारीत सहभागी होता येत नाही अशा वारकऱ्यांना वारीचा ऑनलाईन प्रवास पाहता, अनुभवता येणार आहे.
फेसबुक वारी या पेजवर आपण वारीचे प्रत्येक अपडेट पाहू शकतो. यंदा ही वारी महिलांना, महिलांच्या प्रश्नांना समर्पित करण्यात आलीये. वारी 'ती'ची असं नाव या उपक्रमाला देण्यात आलंय.
तरुणाईनं सोशल मीडियावर सुरू केलेल्या वारीला जगभरातल्या ऑनलाईन वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. यंदा महिलांना ही वारी समर्पित करून महाराष्ट्रातल्या संत परंपरेची पुरोगामी पताका तरुणांनी फडकवत ठेवलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.