मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावधान! अनेक गावं पाण्याखाली; पण अजूनही धोका टळलेला नाही पाहा लेटेस्ट रडार निरीक्षण काय सांगतंय

सावधान! अनेक गावं पाण्याखाली; पण अजूनही धोका टळलेला नाही पाहा लेटेस्ट रडार निरीक्षण काय सांगतंय

मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडवणाऱ्या पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हं नाहीत. पाहा latest Radar observations. पुढचे 24 तास आहे धोका..

मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडवणाऱ्या पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हं नाहीत. पाहा latest Radar observations. पुढचे 24 तास आहे धोका..

मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडवणाऱ्या पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हं नाहीत. पाहा latest Radar observations. पुढचे 24 तास आहे धोका..

मुंबई, 22 जुलै: गेल्या 48 तासांपासून राज्याला झोडपडून काढणाऱ्या आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra Rains) हाहाकार उडवणाऱ्या पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हं नाहीत. मुंबई वेधशाळेच्या (Weather Alert) रडावर आलेल्या लेटेस्ट नोंदीनुसार, अजूनही पश्चिम घाटावर (Western Ghat rain) अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस पडू शकेल असे ढग दिसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे काही तास रायगड, (Raigad floods) पुणे (Pune news), सातारा आणि रत्नागिरी (Ratnagiri rain flood)जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर खूप जास्त उंचीचे आणि दाट ढग (very Intense clouds) जमल्याचं RADAR वर दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठा, घर पाण्याखाली जाऊनही अजून धोका टळलेला नाही.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातल्या अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. पण तरीही अजून पावसाच्या विश्रांतीचं नाव नाही.

गेल्या 24 तासांत रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी तर 400 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यांच्या मार्गातल्या अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. चिपळूण शहर पाण्याखाली गेलं आहे.

VIDEO: मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये हाहाकार! अनेक घरे पाण्याखाली; हजारो नागरिक अडकले, मदतीसाठी आक्रोश

 त्यापाठोपाठ महाड, खेड ही रायगड जिल्ह्यातली शहरही पुराने वेढली जात आहेत.

पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस सुरू असल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प आहे. खंडाळ्याच्या घाटात दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प आहे. नाशिककडे जाणारी वाहतूकही कसारा घाटात दरडी पडण्याचं सत्र सुरू असल्याने विस्कळीत आहे.

कोकणात (Heavy rain in Konkan) परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात (Chiplun City) पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला (Vashisht River) पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी (rain water in houses) शिरल्याचं पहायला मिळत आहे.

LIVE VIDEO: पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती, पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून

अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. घरे तसेच इमारतींचे तळमजले हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पहायला मिळत आहे. चिपळुणात जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत त्यामुळे मदतीचे मार्गही बंद झाले आहेत. 2005 नंतर प्रथमच अशा प्रकारे चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे.

चिपळूणच नाही तर खेड आणि रत्नागिरीतील इतर परिसरात सुद्धा अशाच प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे महाड शहर संपूर्ण जलमय झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 165.18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. माथेरान येथे सर्वाधिक 331 मिमी तर कर्जत 321 मिमी पावसाची नोंद झाली.

VIDEO उल्हास नदीच्या शेजारील बंगले पाण्याखाली, नागरिकांचे मदत आणि बचावकार्य सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदीला पूर आल्याने खेड मधील खाडीपट्टा विभागातील अलसुरे मोहल्ल्याला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या मोहल्ल्यात जवळपास 120 हून अधिक लोक अडकले आहेत. या गावात जाणारे सगळे मार्ग बंद झाल्याने गावात मदत करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

First published:

Tags: Konkan, Monsoon, Rain, Rain flood, Weather, Weather warnings