मुंबई, 12 जुलै- अनैतिक प्रेमसंबंधातून आग्रीपाडा परिसरात 20 वर्षीय तरुणाचा नवव्या मजल्यावरून तोल जाऊन मृत्यू झाला आहे. 7 जुलैच्या रात्री ही घटना घडली आहे. प्रेयसीचा पती घरात झोपला असताना तरुण तिला भेटण्यासाठी तिच्या घरात आला होता. अचानक पतीला जाग आल्याचे पाहूण तरुणाने तिथून पळ काढला. बेडरुमच्या खिडकीतून तो बाहेर निघाला. नवव्या मजल्यावरून आठव्या मजल्यावर येण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर (नाव बदलले आहे) नायर रोड परिसरात कुटुंबीयांसोबत राहात होता. त्याची विवाहीत प्रेयसी देखील पतीसोबत त्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते. प्रेयसीचा पती घरात झोपला असताना 7 जुलैच्या रात्री सागर प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. दोघे घरात असताना अचानक तिच्या पतीला जाग आल्याचे लक्षात येताच सागरने नेहमीप्रमाणे नवव्या मजल्यावरील खिडकीतून आठव्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला. त्याचा जागेवर मृत्यू झाला. सुरक्षारक्षकाने त्याला रक्तबंभाळ अवस्थेत पाहले. तातडीने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
VIDEO: धक्कादायक! कारागृहात चालवला जातोय जुगार अड्डा