वैभव सोनवणे, पिंपरी-चिंचवड, 30 नोव्हेंबर : ऑगस्ट महिन्यात नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी अजून ही मोगलाईत वावरत आहेत अशी घटना पुढं आलीय. मुजोरी आणि दादागिरीची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली असून तरुणांना मारहाण करून पैसे लूटणारा गुन्हे शाखेचा कॉन्स्टेबल रमेश गोळे वर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
पिंपरी आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे पोलीस कर्मचारी रमेश नाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खेड शिवापूर मधून भंगार मालाच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चार तरुणांना 20 तारखेला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतलं होतं. दोन ते तीन दिवस या तरुणांना त्यांनी बेकायदा डांबून ठेऊन जबर मारहाण केली.
त्यांच्याकडून धमकावून 8.50लाख रुपये जबरदस्तीने घेतले. नंतर या तरुणांनी त्याची तक्रार केली. ससून रुग्णालयात त्यांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये ही या तरुणांना गंभीर मारहाण केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या तरुणांवर कुठलाही गुन्हा नसताना बेकायदा डांबून ठेऊन गंभीर मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळून शेवटी त्यांना सोडून देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणात पीडीत मुस्तक खान यानं पुण्याच्या न्यायालयातही तक्रार दाखल केली आहे.
रमेश नाळे हा गुन्हे शाखेच्या युनिट 1 चा कर्मचारी आहे. रमेश नाळे याची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. मुस्तक खान याला ताब्यात घेतल्यावर त्याने आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं, तेव्हा धनकावडीतल्या एक व्यापाऱ्यांकडून कर्ज घेऊन हे पैसे नाळे याने द्यायला लावलेत.
या व्यापाऱ्याच्या दुकानातल्या सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झालाय. महत्वाचं म्हणजे नाळे याने या मुलांना ताब्यात घेऊन चौकशी करत असल्याची कुठलीही माहिती वरिष्ठांना दिलेली नव्हती अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी दिलीय.
कुंपनानेच शेत खाण्याचा हा सगळा प्रकार आहे. गुन्हे शाखेचा साधा कर्मचारी थेट मारहाण करून धमकावून जर असले प्रकार करत असेल तर नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न सामाजिक कार्यकत्यांनी केला आहे.
VIDEO : छेड काढणाऱ्या युवकाला मुलींनी चपलेनं बड.. बड.. बडवलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.