मालगाडीने मायलेकरांना उडवलं, आई आणि 8 महिन्याच्या बाळासह 4 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू

मालगाडीने मायलेकरांना उडवलं, आई आणि 8 महिन्याच्या बाळासह 4 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू

आज सकाळी 11 च्या सुमारासही ह्रदयद्रावक घटना घडली.

  • Share this:

विजय राऊत, प्रतिनिधी

पालघर, 19 जानेवारी : बोईसर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना मायलेकरांना मालगाडीची जोरात धडक बसली. या अपघातात आईसह 4 वर्षांची मुलगी आणि 8 महिन्याचा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आज सकाळी 11 च्या सुमारासही ह्रदयद्रावक घटना घडली. बोईसर यार्डाजवळ असलेल्या खैराफाटक पुलाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीने तिघांना उडवलं. यामध्ये मातेसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मातेसह आठ महिन्यांचे बाळ आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही. या पुलानजीक अपघात घडण्याची ही जवळपास सहावी घटना आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोईसर यार्डाजवळ एक्स्प्रेस आली असता रेल्वे रूळ ओलांडत असताना महिला आणि तिच्यासह मुलांना धडक बसली. त्यानंतर मोटरमॅनने स्टेशन मास्तरला याबद्दल माहिती कळवली. स्टेशन मास्तरच्या माहितीनंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही.  परंतु, हा अपघात होता की आत्महत्या होती, हे अजून कळू शकले नाही. याबद्दल पोलीस तपास करत आहे.

‘पप्पा तुम्ही परत या...’, बाप गेल्याचं दु:ख मांडणाऱ्या चिमुरड्याचा निबंध वाचून पाणीच येईल डोळ्यात!

वय वर्ष 10-11, इयत्ता चौथीत शिकणारा मंगशे वाळके हा मुलगा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीत राहणाऱ्या मंगेशच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. एकीकडे वडिल नाही दुसरीकडे आई अपंग अशा मंगेशने बाळहट्ट पुरवायलाही कोणी नाही. अशा या चिमुरड्यावर आपल्या वडिलांवर पत्र लिहिण्याची वेळ आली अन् त्यानं सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या आहेत. सध्या मंगेशचा निबंध सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाळेत मंगेशला माझे बाबा या विषयावर निबंध लिहावा लागला आणि त्यानं आपल्या मनातील सर्व दु:ख बाहेर काढले. या निबंधाची दखल सामाजित न्याय विकास मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घ्यावी लागली.

मंगेशनं लिहिलेला निबंध –

“माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा 18ला वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या, आई अपंग आहे त्यामुळं मला आईला मदत करावी लागते”

धनंजय मुंडे यांनी जाहीर केली मदत

सामाजिक न्याय्य मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ मंगेशला मदत जाहीर केली आहे. समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रूपये स्वयंरोजगारासाठी, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5% बसचा पास आणि दिव्यांग महामंडळामार्फत आणखी काही योजना लागू करून भरीव आर्थिक मदत करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: palghar
First Published: Jan 19, 2020 09:26 PM IST

ताज्या बातम्या