मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रत्नागिरीत घरात सापडला गावठी बंदुकीसह स्फोटकांचा साठा

रत्नागिरीत घरात सापडला गावठी बंदुकीसह स्फोटकांचा साठा

खेड तालुक्यातील तळे जांभूळवाडी इथं एका तरुणाच्या घरात गावठी बंदुकीसह स्फोटक पदार्थ सापडले

खेड तालुक्यातील तळे जांभूळवाडी इथं एका तरुणाच्या घरात गावठी बंदुकीसह स्फोटक पदार्थ सापडले

खेड तालुक्यातील तळे जांभूळवाडी इथं एका तरुणाच्या घरात गावठी बंदुकीसह स्फोटक पदार्थ सापडले

10 एप्रिल : रत्नागिरीतील खेड येथे एका तरुणाच्या घरात गावठी बंदुकी आणि स्फोटकांचा साठा सापडल्याची खळबळजनक घटना घडलीये. मात्र, संशयित तरुणाने तिथून पळ काढलाय. खेड तालुक्यातील तळे जांभूळवाडी इथं एका तरुणाच्या घरात गावठी बंदुकीसह स्फोटक पदार्थ सापडले. घरामध्ये  २.७८ किलोच्या दोन जिलेटीनच्या कांड्या आणि ८३ एम एमचे ५ डिटोनेटर, गन पावडर, छरे सापडले आहे. खेड पोलिसांनी आर्म अॅक्टसह भारी पदार्थ अधिनियमांतर्गत या तरुणाविरोधात दाखल केला आहे. खेड पोलिसांनी दहशतवादी विरोधी पथकालाही याबद्दल कळवलं आहे. संशयित तरुण पळाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
First published:

Tags: Ratnagiri, रत्नागिरी

पुढील बातम्या