Home /News /maharashtra /

पार्सलमधून महागडे फोन लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयला असं अडकवायचे जाळ्यात

पार्सलमधून महागडे फोन लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयला असं अडकवायचे जाळ्यात

Crime in Satara: वेगवेगळ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग करून महागडे फोन मागवणाऱ्या आणि हे मोबाइल हातोहात गायब करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला (expensive mobile theft gang exposed ) आहे.

    कराड, 13 ऑक्टोबर: वेगवेगळ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग करून महागडे फोन (Mobile phone online booking) मागवणाऱ्या आणि हे मोबाइल हातोहात गायब करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला (expensive mobile theft gang exposed ) आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत पाच भामट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी अशाप्रकारे आणखी कितीवेळा डिलिव्हरी बॉयला गंडा घातला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. रॉबिन अँथोनी आरोजा (वय-26), किरण अमृत बनसोडे (वय- 24), राहुल मच्छिंद्र राठोड (वय-21), रॉकी दिनेश कर्णे (वय-21) आणि गणेश ब्रम्हदेव तिवारी (वय-39 ) असं अटक केलेल्या पाच आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी ठाणे जिल्ह्यातील आसपासच्या परिसरातील रहिवासी आहेत. संबंधित सर्व आरोपी विविध संकेतस्थळावरून विविध पत्त्यावर महागडे फोन ऑनलाइन मागवायचे आणि डिलिव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून संबंधित महागडे मोबाइल लंपास करायचे. हेही वाचा-बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्...; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील पाच वेगवेगळ्या पत्त्यावर पाच पार्सल आली होती. संबंधित कुरिअर कंपनीने पाच वेगवेगळ्या डिलिव्हरी बॉयद्वारे संबंधित पार्सल नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवली होती. संबंधित पत्त्यावर गेल्यानंतर आरोपींनी डिलिव्हरी बॉयला देय रक्कमेपेक्षा कमी रक्कम दिली. तसेच सर्व पैसे सुट्टे दिले. हेही वाचा-खोटेपणा उघड झाला अन् बीएमसीतील नोकरी गेली; बुलडाण्यात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल आरोपींनी डिलिव्हरी बॉयला सुट्टे पैसे मोजण्यात गुंतवून ठेवत, त्याच्या पार्सलमधील महागडे फोन काढून घेतले. तसेच सध्या कमी पैसे आहेत, मी पार्सल कार्यालयातून फोन घेऊन जातो, असं सांगत डिलिव्हरी बॉयला परत जाण्यास सांगितलं. पण काही वेळातच आपली फसवणूक झाल्याची बाब डिलिव्हरी बॉयच्या लक्षात आली. यानंतर संबंधित कुरिअर कंपनीच्या मॅनेजरनं कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास कराड शहर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Online fraud, Satara

    पुढील बातम्या