मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उजनीत आढळला टोकदार दातांचा विदेशी मासा; जीव तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

उजनीत आढळला टोकदार दातांचा विदेशी मासा; जीव तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी (Ujani Dam) पाणलोट क्षेत्राच्या फुगवट्याच्या पाण्यात एक विदेशी मासा (Exotic fish) आढळला आहे.

  • Published by:  News18 Desk

करमाळा, 02 नोव्हेंबर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी (Ujani Dam) पाणलोट क्षेत्राच्या फुगवट्याच्या पाण्यात एक विदेशी मासा (Exotic fish) आढळला आहे. संबंधित क्षेत्रात मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्यात अर्धा किलो वजनाचा एक विदेशी मासा आढळला आहे. एरवी उजनीच्या गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात चिलाफी मासा आढळतो. पण याठिकाणी विदेशी मासा पाहून मच्छिमार देखील आचंबित झाले होते.

अंगावर हिरव्या-तांबूस आणि सिल्व्हर रंगाच्या छटा असलेला हा मासा आढळल्यानंतर संबंधित मच्छिमारांनी या माशाचे फोटो जीव तज्ज्ञांकडे पाठवले होते. छायाचित्र प्राणीशास्त्र आणि पर्यावरण प्रेमी डॉ. अरविंद कुंभार यांनी दिव्य मराठीला सांगितलं की, हा मासा परदेशी असून या माशाला स्कॅतोफेगस (scatopahus argus fish), बटर फिश, कॉमन स्कॅट (common scat fish), टायगर स्कॅट (tiger scat) या नावाने ओळखलं जातं. पण स्थानिक मच्छिमार या माशाला चंदा मासा (Chanda Fish) म्हणून ओळखतात.

हेही वाचा-'अखेरपर्यंत न्याय नाही मिळाला' खचलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाने दिला जीव

या माशाचं मूळ स्थान जपान, न्यू गिनी आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातील चिखलयुक्त सागरी भागात आणि खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतो.  या भागातील कांदळवनात देखील या जातीचे मासे मोठ्या प्रमाणत आढळतात, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

हेही वाचा-नाशिक: इंजिनिअर झालेल्या भावड्याने सुरू केला भलताच बिझनेस; कांड वाचून हादराल!

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. कुभार यांनी सांगितलं की, सामान्यपणे हा मासा आयत आकारात सापडतो. या माशांचे डोळे बटबटीत असतात तर त्याचं तोंड गोलाकार असतं. तसेच त्यांच्या जबड्यात छोटे पण टोकदार दात दोन ओळीत असतात. त्यामुळे हा मासा आपल्या भक्ष्याला सहजरित्या घायाळ करू शकतो. यासोबतचं या माशांवर काटेरहित पर आणि हिरव्या-तांबूस आणि सिल्व्हर रंगाच्या छटा असलेली कातडी असते. तसेच करड्या आणि तांबड्या रंगाचे गडद ठिपके देखील त्यांच्या अंगावर असतात.

First published:

Tags: Solapur