येवल्यामध्ये छगन भुजबळांचं मॅजिक चाललं का? पाहा EXIT POLLचा निकाल

येवल्यामध्ये छगन भुजबळांचं मॅजिक चाललं का? पाहा EXIT POLLचा निकाल

288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो.

  • Share this:

येवला, 21 ऑक्टोबर : News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या  Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार, येवल्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर छगन भुजबळांचं मॅजिक चाललं आहे.

येवला-लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?

छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ हे अनेक वर्षांचं समीकरण आहे. पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला - लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ हे सलग तीन वेळा निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याच पक्षातले माणिकराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारीसाठी आव्हान दिलं आहे.

2009 मध्ये छगन भुजबळांचे समर्थक माणिकराव शिंदे यांनी भुजबळांची साथ सोडून शिवसेनेत गेले. त्यांना शिवसेनेने उमेदवारी मिळाली दिली पण या निवडणुकीत छगन भुजबळच निवडून आले.

2014 च्या निवडणुकीत छगन भुजबळांसोबत असलेले माजी आमदार मारुती पवार यांचे पुतणे संभाजी पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण यावेळीही छगन भुजबळच निवडून आले.

छगन भुजबळ निवडून आले खरे पण राज्यात सेना - भाजप युतीचं सरकार आलं आणि भुजबळांसमोर एकेक संकटं उभी ठाकली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर या मतदारसंघातलं भुजबळांचं वर्चस्व कमी होऊ लागलं.

असं असलं तरी येवला मतदारसंघात भुजबळांनी केलेल्या कामांमुळे अजूनही मतदार त्यांच्या बाजूने आहेत. इथल्या पाण्याच्या प्रश्नावर उपाय काढण्यासाठी छगन भुजबळांनी मांजरपाडा धरणाचं काम मार्गी लावलं. येवल्याचं रूप पालटून टाकण्यात त्यांचं योगदान मोठं आहे हेही इथले लोक विसरलेले नाहीत.

लोकसभा निवडणुकीत मात्र छगन भुजबळांचा या मतदारसंघावर असलेला प्रभाव दिसला नाही. युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना या विधानसभा मतदारसंघात चांगली मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे याचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर उमटण्याची शक्यता आहे.

2014 च्या निवडणुकीत छगन भुजबळांच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार आणि पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती रुपचंद भागवत यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या परिस्थितीत छगन भुजबळ विजयी होणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा-2014 मतदानाची आकडेवारी

छगन भुजबळ (राष्ट्रवादी) - 1,12,787

संभाजी पवार (शिवसेना) 66,345

पौलस अहिरे (बसपा) - 1101

Published by: Manoj Khandekar
First published: October 21, 2019, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading