EXIT POLL : पार्थ पवारांचं काय होणार? मावळचं भवितव्य सांगतोय 'हा' निकाल

EXIT POLL : पार्थ पवारांचं काय होणार? मावळचं भवितव्य सांगतोय 'हा' निकाल

Abp आणि Nielsen यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघानुसार निकालाचे अंदाज बांधण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 मे : मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. Abp आणि Nielsen यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघानुसार निकालाचे अंदाज बांधण्यात आले आहेत. मावळ मतदारसंघाचा एक्झिट पोलचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू पार्थ पवारच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभेची लढत यावेळी खूपच गाजली. इथे पार्थ पवार यांची लढत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याशी होती. ही लढत पार्थ पवार यांनी जिंकली असल्याचा अंदाज एबीपी- निल्सन यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

काय आहे ग्राउंड रिपोर्ट?

राष्ट्रवादीचे राज्यातले प्रमुख नेते आणि शरद पवारांचे पुतणे - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी आपला सगळा जोर मुलासाठी लावला होता.श्रीकांत बारणेंच्या विरोधात पार्थ उमेदवार म्हणून नवखे असले तरी अजित पवारांची सगळी ताकद त्यांच्यामागे होती.

शरद पवारांची माघार

पार्थच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली. एकाच कुटुंबातले एवढे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नको, अशी शरद पवारांची भूमिका होती.

मावळ मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. यानंतर लगेचच 2009 मध्ये इथे निवडणूक झाली. त्यावेळी शिवेसेनेचे गजानन बाबर तिथून जिंकून आले. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेच्याच श्रीरंग बारणे यांनी इथून निवडणूक जिंकली.

शेकापचा आघाडीला पाठिंबा

यावेळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी दिली. इथे वंचित बहुजन आघाडीच्या राजाराम पाटील यांनाही तिकीट देण्यात आलं. त्याचबरोबर इथल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचीही भूमिका महत्त्वाची होती. शेकापने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीला पाठिंबा दिला होता.

मावळ लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात पनवेल, मावळ, चिंचवड, उरण, पिंपरी आणि कर्जत मतदारसंघाचा समावेश आहे.

मागच्या निवडणुकीत सेनेला यश 

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना घवघवीत यश मिळालं होतं. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर होता. राष्ट्रवादीकडून तेव्हा राहुल नार्वेकर यांनी निवडणूक लढवली होती. इथे आम आदमी पार्टी चौथ्या क्रमांकावर होती.

29 एप्रिलला झालं मतदान

मावळमध्ये यावेळी चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. यावेळी इथे सुमारे 60 टक्के मतदानाची नोंद झाली.

VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

First published: May 20, 2019, 6:18 PM IST

ताज्या बातम्या