EXIT POLL 2019 : वंचित आणि MIM चं काय होणार? IPSOS आणि News 18 लोकमतच्या एक्झिट पोलचा अंदाज

EXIT POLL 2019 : वंचित आणि MIM चं काय होणार? IPSOS आणि News 18 लोकमतच्या एक्झिट पोलचा अंदाज

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही, असा IPSOS आणि News 18 लोकमतच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. MIM ला या निवडणुकीत फटका बसणार, अशी शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही, असा IPSOS आणि News 18 लोकमतच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. MIM ला या निवडणुकीत फटका बसणार, अशी शक्यता आहे. या पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी मागच्या निवडणुकीत अस्तित्वात नव्हती तर MIM ला मागच्या निवडणुकीत 2 जागा होत्या.

मागील विधानसभेत काय होती स्थिती?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

2014 महाराष्ट्र विधानसभेची स्थिती

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

======================================================================================

मुर्दाबाद..मुर्दाबाद..म्हणत EVM मशीनवर फेकली शाई, ठाण्यातला LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या