6 EXIT POLL; 6 अंदाज : कुठल्या पोलने दिल्यात काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा?

6 एक्झिट पोल्सच्या निकालांमध्ये सर्वांनीच भाजप युतीला बहुमत दिलं आहे. एका एक्झिट पोलने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 90 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 08:10 PM IST

6 EXIT POLL; 6 अंदाज : कुठल्या पोलने दिल्यात काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा?

मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. पण News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीसह सर्व इतर माध्यमांनी केलेल्या EXIT POLL  च्या निकालांमध्ये भाजप - शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसतं. 6 एक्झिट पोल्सच्या निकालांमध्ये सर्वांनीच भाजप युतीला बहुमत दिलं आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज News18 च्या EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं हा Exit Poll चा निकाल सांगतो. युतीला सर्वांत कमी जागा इंडिया टुडे अॅक्सिसने केलल्या मतदानोत्तर चाचणीत दिल्या आहेत. India Today Axis Exit poll नुसार, भाजप-सेना महायुती - 166-194

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 72-90 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस आघाडीला जास्तीत जास्त 90 जागा मिळतील असा अंदाज या एकमेव एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. यापेक्षा जास्त जागा आघाडीला कुठल्यागी एक्झिट पोलने दिलेल्या नाहीत.

News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

News18 IPSOS

भाजप-सेना महायुती - 243

Loading...

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 41

अन्य - 4

पक्षानुसार एक्झिट पोलचा अंदाज

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर  - 02

अपक्ष - 03

------------------------------

इथे पाहा सर्व 6 एक्झिट पोल्सचे अंदाज... एका क्लिकवर

Times Now

भाजप-सेना महायुती - 230

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 48

अन्य - 10

-------------------

ABP C Voter -

भाजप-सेना महायुती - 204

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 69

अन्य - 15

---------------------

India Today Axis

भाजप-सेना महायुती - 166-194

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 72-90

अन्य - 22-34

-------------------

Republic Jan ki baat -

भाजप-सेना महायुती - 216-230

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 50-69

अन्य - 8-10

-----

TV9 - Cicero

भाजप-सेना महायुती - 197

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 75

अन्य - 16

----

अन्य बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...