EXIT POLL 2019 : निकालाआधीच आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीने गांधी कुटुंबावर साधला निशाणा

EXIT POLL 2019 : निकालाआधीच आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीने गांधी कुटुंबावर साधला निशाणा

विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तू तू मैं मैं सुरू झालं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संभाव्य पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्रात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संभाव्य पराभवाचं खापर काँग्रेसवर

या एक्झिट पोलनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तू तू मैं मैं सुरू झालं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संभाव्य पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. पूर्ण निवडणुकीत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी दिसल्या नाहीत. राहुल गांधी आले पण काँग्रेसचेच नेते त्यांच्या सभांमध्ये दिसले नाहीत. फक्त शरद पवारांनीच एकट्याने मेहनत केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी म्हटलं आहे. जनतेने आमच्या बाजूने कौल दिलेला नाही हे आम्हाला मान्य आहे, काँग्रेसशी आघाडी करणं हा आमचा नाईलाज होता. एकट्याने निवडणूक लढणं शक्य नव्हतं, असंही ते म्हणाले.

(हेही वाचा : EXIT POLL 2019 : बारामतीमध्ये अजित पवारांसाठी निवडणूक अवघड, सर्व्हेचा अंदाज)

महायुतीला 243 जागांचा अंदाज

महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

=======================================================================================

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 08:21 PM IST

ताज्या बातम्या