• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोल्हापूरच्या पावनगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे, पाहा हा EXCLUSIVE VIDEO

कोल्हापूरच्या पावनगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे, पाहा हा EXCLUSIVE VIDEO

महादेव मंदिराच्या शेजारी दिशादर्शक फलक लावण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी खड्डा खोदला होता.

  • Share this:
कोल्हापूर, 04 फेब्रुवारी : कोल्हापूरच्या पावनगडावर (pavangad kolhapur) ऐतिहासिक शिवकालीन ठेवा सापडला आहे. शेकडो तोफगोळे आढळून आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून तोफगोळे पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावर तोफगोळे सापडले आहे. पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना तोफगोळे आढळून आले. एकूण 406 तोफगोळे सापडले आहे. महादेव मंदिराच्या शेजारी दिशादर्शक फलक लावण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी खड्डा खोदला होता. त्यावेळी हे तोफगोळे आढळून आले. 'कलम 370 बद्दल सरकारला दोष दिला ही चूक' काश्मिरी माजी अधिकाऱ्याला उपरती हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात आला आहे. गडावर तोफगोळे आढळून आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे तोफगोळे पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे. पुरातत्व विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. घटनास्थळाची पाहणी करत आहे. विशेष म्हणजे,  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती केली होती. त्यामुळे पावनगडावर तोफगोळे सापडण्याच्या घटनेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Published by:sachin Salve
First published: