EXCLUSIVE : महाराष्ट्रात का लागली राष्ट्रपती राजवट? 'तो' अहवाल 'न्यूज18 लोकमतच्या' हाती

EXCLUSIVE : महाराष्ट्रात का लागली राष्ट्रपती राजवट? 'तो' अहवाल 'न्यूज18 लोकमतच्या' हाती

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करताना नेमकी काय कारणं सांगितली होती, याबाबतचा अहवाला 'न्यूज18 लोकमत'च्या हाती लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही राजकीय पक्ष सत्तास्थापना न करू शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याने अनेक नेत्यांना यावर आक्षेप घेतला होता. मात्र आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करताना नेमकी काय कारणं सांगितली होती, याबाबतचा अहवाला 'न्यूज18 लोकमत'च्या हाती लागला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविलेला अहवाल समोर आला आहे. या 15 पानांच्या अहवालात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यामागील कारणे दिली आहेत. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 'सरकार निर्मितीच्या अनिश्चिततेमुळे घोडे बाजार होण्याची शक्यता होती. राज्यातील पक्षांची स्थिती बघता भाजप सरकार स्थापन करू शकत नाही आणि इतरांना मतदानपूर्व आघाडी नव्हती,' अशी कारणं राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणाऱ्या अहवालात देण्यात आली आहेत.

सस्पेन्स संपणार! सत्तास्थापनेबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीनंतर बैठकांना पूर्णविराम मिळेल आणि येत्या 4 ते पाच दिवसांमध्ये राज्यात महाशिवआघाडीचं लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यात काल चर्चा झाली आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. 'काँग्रेसमध्ये निर्णयाची एक प्रक्रिया आहे. उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरकार बनेल. डिसेंबरपर्यंत राज्यात मजबूत सरकार येईल. येत्या पाचसहा दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. आम्ही बहुमताचा आकडा राज्यपालांकडे घेऊन गेल्यावर आम्हाला राज्यस्थापनेची परवानगी मिळेल,' असं म्हणत संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबद्दल माहिती दिली आहे.

VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

Published by: Akshay Shitole
First published: November 20, 2019, 12:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading