राष्ट्रवादीचे 10 तर काँग्रेसचे 9 मंत्री ठरले! संभाव्य मंत्र्यांची यादी 'न्यूज18 लोकमत'च्या हाती

राष्ट्रवादीचे 10 तर काँग्रेसचे 9 मंत्री ठरले! संभाव्य मंत्र्यांची यादी 'न्यूज18 लोकमत'च्या हाती

काँग्रेसनेही आपली यादी तयार केल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या अनोख्या आघाडीचं सरकार येणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश असेल, याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेऊन दाखल झाले होते. त्यानंतर आता काँग्रेसनेही आपली यादी तयार केल्याची माहिती मिळाली आहे.

काही वरिष्ठ नेत्यांकडून 'न्यूज18 लोकमत'ला संभाव्य नेत्यांच्या नावाबाबत माहिती मिळाली आहे. संभाव्य मंत्रिमंडळातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर धुरा देण्याचं ठरवलेलं दिसत आहे. आघाडी सरकारमध्ये सामील असलेले अनेक नेते पुन्हा नव्या मंत्रिमंडळातही दिसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे

जयंत पाटील

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

अनिल देशमुख

धनंजय मुंडे

छगन भुजबळ

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

मकरंद पाटील

राजेश टोपे

या नेत्यांसह राष्ट्रवादीकडून आणखी काही नावांवर अद्याप विचार सुरू आहे.

काँग्रेसच्या संभाव्य नेत्यांची नावे

अशोक चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब थोरात

विजय वडेट्टीवार

के सी पाडवी

विश्वजीत कदम

यशोमती ठाकूर

सतेज बंटी पाटील

सुनिल केदार

नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेसचेही एकूण 15 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आणखी काही नावांबाबत खलबतं सुरू असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रिपदाचीही होणार विभागणी?

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 21, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading