पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आलं नाही? - चंद्रकांत खैरे

पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आलं नाही? - चंद्रकांत खैरे

'मी ही शेवटची निवडणूक लढवणार होतो आणि नंतर देशभर शिवसेनेचा प्रचारक म्हणून फिरणार होतो. पण पराभव पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग माझ्यावर आला.'

  • Share this:

औरंगाबाद 8 जून : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभव पचवणं अवघड जातंय. पराभवाच्या धक्क्यातून ते अजुनही सावरू शकले नाहीत. मी कायम शिवसेनेसाठी आणि लोकांसाठी काम केलं. ही माझी शेवटची निवडणूक होती. हा पराभव बघावा लागणं हे क्लेशकारक आहे. हा पराभव पाहाण्याआधी मला मरण का आलं नाही असे भावनिक उद्गगार त्यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना काढले.

खैरे म्हणाले, मी ही शेवटची निवडणूक लढवणार होतो आणि नंतर देशभर शिवसेनेचा प्रचारक म्हणून फिरणार होतो. हे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सांगितलं होतं. मी कायम लोकांसाठी राबलो. बंगला, घर, फॉर्म हाऊस अशी संपत्ती गोळा केली नाही. फक्त शिवसेना आणि हिंदू बांधवांसाठी आणि जे सोबत आले अशा सगळ्यांसाठी काम केलं असं असतानाही पराभव पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग माझ्यावर आला असं भावनिक होत त्यांनी शिवसैनिकांसमोर आपलं दु:ख व्यक्त केलं.

बछड्यांच्या नामकरणावरून वाद

शहरातील सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीने दिलेल्या चार बछड्यांचा नामकरण सोहळा शनिवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने पार पडला. 26 एप्रिल रोजी जन्मलेल्या नर बछड्याचे नाव कुश आणि तीन मादी बचड्यांची नावे अर्पिता, देविका आणि प्रगती अशी ठेवण्यात आली आहे. बरश्याचा कार्यक्रम अर्पिता, देविका, प्रगती आणि कुश अशी बछड्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. यासाठी नागरिकांना बछड्यांसाठी नावं सुचवण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल अडीच हजार नावे सुचवली होती. यातूनच या बछड्यांची नावे निवडण्यात आली आहेत. मात्र, बछड्यांच्या बारशावरून मानापमानाचे नाट्य रंगले आहे. माजी चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

कार्यक्रम पत्रिकेतून खासदार इम्तियाज जलील गायब

महापालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेत नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न दिल्याने एमआयएनचे कार्यकर्त्ये आक्रमक झाली आहेत. नामकरण सोहळ्यासाठी शहरातल्या आमदारांना आमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. परंतु खासदार इम्तियाज जलील यांचा मात्र सोयीस्कर विसर पडलेला दिसला. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

First published: June 8, 2019, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading