Home /News /maharashtra /

माजी सरपंचाने गरोदर वनरक्षक महिलेला आणि पतीला लाथाबुक्क्याने केली मारहाण, LIVE VIDEO

माजी सरपंचाने गरोदर वनरक्षक महिलेला आणि पतीला लाथाबुक्क्याने केली मारहाण, LIVE VIDEO

'मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली.

सातारा, 19 जानेवारी : सातारा (satara) जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सरपंच (sarpanch) आणि त्याच्या पत्नीने  एका गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संताजपनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावात ही घटना घडली आहे. माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात गेल्या आहेत तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. 'मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा विडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी एका  महिला वनरक्षकास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असं चाकनकर यांनी स्पष्ट केलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या