माजी खासदार शालिनी पाटील यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

माजी खासदार शालिनी पाटील यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

हायकोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला असूनही कारवाई करण्यास ईडी टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केला.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, मुंबई, 24 जानेवारी : माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 10 वर्षापूर्वी माझा साखर कारखान्याचा बेकायदेशीररित्या लिलाव करण्यात आला. हायकोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला असूनही कारवाई करण्यास ईडी टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केला.

साताऱ्याच्या कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याचा शिखर बँकेने लिलाव केला होता. मात्र हा लिलाव हेतूपुरस्सर करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 65 लाख एवढी आहे. त्या कंपनीने 60 कोटीहून अधिक किंमतीचा साखर कारखाना खरेदी केला.

खरेदीनंतर हा कारखाना बीव्हीजी गृपकडे वळवण्यात आल्याची माहिती शालिनी पाटील यांनी दिली. या सगळ्यामागे अजित पवार आणि तत्कालीन शिखर बँकेच्या संचालकांचा हात असल्याचा आरोपही शालिनी पाटील यांनी केला आहे.

शिखर बँक घोटाळ्याचा अजित पवारांवर आरोप

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 31 बँक संचालकांविरुद्ध पोलिसांनी याआधी गुन्हे दाखल केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरून कोर्टाने काही दिवसांपूर्वीच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर आज गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याने अजित पवार अडचणीत सापडले होते.

First published: January 24, 2020, 4:18 PM IST
Tags: ajit pawar

ताज्या बातम्या