कोरोनाचा तडाखा सुरू असताना शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' आणण्यासाठी राजू शेट्टींनी सुचवला उपाय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्यासाठी आणखी एक उपाय सूचवला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. मागणी घटल्याने दुग्धव्यवसायचं गणित पूर्णपणे कोलमडलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही दूध खरेदीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्यासाठी आणखी एक उपाय सूचवला आहे.

'सध्या राज्याच्या सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेतच. तेव्हा गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातून येणारे दुधाचे टँकर अडवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत. म्हणजे अतिरिक्त दूध खरेदीचा राज्यसरकारवरील आर्थिक बोजा कमी होईल,' अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खरंच याबाबत निर्णय घेऊन पोलिसांना तसे आदेश देणार का, हे पाहावं लागेल.

सरकारने केली आहे महत्त्वपूर्ण घोषणा

कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लीटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरू होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरू राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत काल घेण्यात आला.

‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दुधउत्पादक शेतकरी संकटात आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लीटर दुधापैकी 10 लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दुधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलीटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूधउत्पादकांना याचा फटका बसत आहे.

या शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी तसेच कोरोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले 10 लाख लीटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन 25 रुपये प्रतिलीटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading