राज ठाकरेंनंतर आता राजू शेट्टीही सरकारविरोधात आक्रमक, ठाकरे सरकारवर साधला निशाणा

राज ठाकरेंनंतर आता राजू शेट्टीही सरकारविरोधात आक्रमक, ठाकरे सरकारवर साधला निशाणा

पुन्हा एकदा सरकारच्या एका निर्णयाबाबत राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 24 जानेवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र शपथविधी सोहळ्याला सत्ताधारी पक्षांकडून राजू शेट्टी यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही. त्यानंतर राजू शेट्टी यांनी सरकारच्या विविध निर्णयावरून नाराजी व्यक्त केली. शेतकरी कर्जमाफीवरूनही राजू शेट्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा सरकारच्या एका निर्णयाबाबत राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.

'भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय सरसकट बदलणे चुकीचे आहे. बाजार समितीत शेतकरी मतदान हक्क रद्द करणे योग्य नाही,' असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन ठाकरे सरकारला कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची सुबुध्दी देण्याचं साकडे घालणार असल्याचंही राजू शेट्टी म्हणाले.

सदाभाऊ खोत यांच्यावर विखारी टीका

'कडकनाथ घोटाळा प्रकरणात सदाभाऊ खोत दोषी नसतील तर त्यांनी तसं ईडीला जाऊन सांगावं, ज्या पध्दतीने शरद पवार सामोरे गेले तसं खोत हे ईडीला सामोरे का जात नाही?' असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. तसंच सदाभाऊ खोत यांनी केलेल्या आरोपावरूनही आक्रमक उत्तर दिलं आहे. 'असल्या फालतू लोकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही.  मी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. जे येईल त्याला अंगावर घेण्याची तयारी आहे,' असं म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे.

भाजप आणि त्यांचे समर्थक आता तरी ही पडझड मान्य करणार का? शिवसेनेचा थेट सवाल

राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले राजू शेट्टी?

मुंबईत झालेल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांच्या मनसेनं कात टाकली आहे. या अधिवेशनात यांनी शॅडो कॅबिनेटचीही घोषणा केली. याबाबत राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे. 'राज ठाकरे यांची शॅडो कॅबिनेट जर जनतेच्या प्रश्नावरून योग्य पध्दतीने काम करत असेल तर चांगलं आहे,' असं शेट्टी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 09:53 AM IST

ताज्या बातम्या