माजी IAS अधिकाऱ्याला पुण्यातल्या वाचनालयात जाण्यापासून रोखलं, कारण...

माजी IAS अधिकाऱ्याला पुण्यातल्या वाचनालयात जाण्यापासून रोखलं, कारण...

गोपीनाथन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी मला जयकर लायब्ररीमध्ये बोलवलं होतं. जे विद्यार्थी UPSC ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना माझं मार्गदर्शन हव होतं. त्यावर मला सांगण्यात आलं की मी वाचनालयात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज दिला पाहिजे.

  • Share this:

पुणे, 25 सप्टेंबर : काश्मीरच्या मुद्द्यावरून राजीनामा देणारे माजी IAS अधिकारी कन्नन गोपीनाथन यांना पुण्यातल्या वाचनालयात जाण्यापासून रोखलं. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या वाचनालयात जाण्याची परवानगी आपल्याला मिळाली नाही, असं त्यांनी सांगितलं.

जम्मू काश्मीरमधल्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याच्या मुद्द्यावरून कन्नन गोपीनाथ यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता.

कन्नन गोपीनाथन यांनी वाचनालयात जाण्यासाठी अर्ज करावा, असं त्यांना सांगण्यात आलं होतंस असं विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

गोपीनाथन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी मला जयकर लायब्ररीमध्ये बोलवलं होतं. जे विद्यार्थी UPSC ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना माझं मार्गदर्शन हव होतं. त्यावर मला सांगण्यात आलं की मी वाचनालयात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज दिला पाहिजे.

(हेही वाचा : भाजी आणण्यासाठी 10 किमी चालतात हे IAS अधिकारी! फोटो झाले व्हायरल)

याच मुद्द्यावरून विद्यार्थी आणि वाचनालयाचे अधिकारी यांच्यात वाद झाला. त्यामुळे गोपीनाथन यांनी कॉलेजच्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

गोपीनाथन यांना वाचनालयासाठी नियमानुसारच अर्ज द्यायला सांगितलं, असं वाचनालयातल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

=======================================================================================

VIDEO : शरद पवार Uncut प्रेस कॉन्फरन्स; म्हणाले, 27 तारखेला मीच ED ऑफिसला जाणार

Published by: Arti Kulkarni
First published: September 25, 2019, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading