Home /News /maharashtra /

भाजपमधील अंतर्गत युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी फडणवीस सरसावले, खडसेंसोबत बैठक सुरू

भाजपमधील अंतर्गत युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी फडणवीस सरसावले, खडसेंसोबत बैठक सुरू

एकनाथ खडसे यांची वाढती नाराजी भाजपसाठी घातक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर डॅमेज कण्ट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

    जळगाव, 3 जानेवारी : भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात जळगावमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीला जळगावमधील भाजप नेते गिरीश महाजन हेदेखील उपस्थित आहेत. एकनाथ खडसे यांची वाढती नाराजी भाजपसाठी घातक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर डॅमेज कण्ट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक काळात डावललं गेल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडेस यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. आधीच सत्ता हातातून गेल्यानंतर या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे पक्ष अधिक संकटात जाऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ खडसेंची नाराजी दूर होणार? विधानसभा निवडणुकीत झालेल्या मुलीच्या पराभवास आणि आपले तिकीट कापण्यात पक्षातील काही लोकांचा हात असल्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे यांनी आता थेट संबंधित नेत्यांची नावंच जाहीर केली आहे. 'मला तिकीट मिळू नये म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत नकारात्मक अहवाल दिला होता. या कमिटीतील माझ्या जवळच्या मित्रांनीच मला ही माहिती दिली,' असा खळबळजनक गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. पालकमंत्री आणि खातेवाटपाची यादी तयार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा 'जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मी त्यांना ही सर्व माहिती दिली आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले तरी माझे समाधान झालेले नाही. मात्र मी भाजप सोडणार नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा लागले पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामाला राज्यात सत्तांतर होऊन खातेवाटपाचा घोळ सुरु असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटनेवर काम करायला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदांच्या स्थानिक निवडणुकांच्या निमित्ताने फडणवीस आता राज्यांच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे सुरू केले आहेत. ज्या सहा जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्यांचा फडणवीस दौरा करत आहेत. फडणवीस यांनी पालघर आणि नागपूरचा दौरा केल्यानंतर आज ते उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. जळगाव इथे ते पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्याशी एकत्रित बैठक घेऊन पक्षातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर ते नंदूरबार आणि धुळे येथे कार्यकर्ता मेळावा घेतील. त्यानंतर लगेचच उद्या अकोला आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांच्या दौरा फडणवीस करणार आहेत. तसंच परवा फडणवीस पुन्हा नागपूरला जाणार आहेत. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामाला लागले आहेत हेच यावरुन दिसत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या