वरळीत EVM मशीनमध्ये बिघाड; अनेक मतदार परतले

वरळी मतदारसंघात एका केंद्रात EVM मशीन वारंवार बिघडत असल्यामुळे काही काळ गोंधळ झाला. 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 5 वेळा ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे या मतदारसंघाकडे लक्ष आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 04:03 PM IST

वरळीत EVM मशीनमध्ये बिघाड; अनेक मतदार परतले

मुंबई, 21 ऑक्टोबर : मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रात EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आली. बराच वेळ मतदान केंद्रावर रांग लागलेली बघायला मिळाली. वरळीत मतदान बूथ क्रमांक 62 मध्ये मतदान यंत्र बिघडल्याने काही काळ मतदान थांबवावं लागलं. तिथल्या बूथ ऑफिसरने नवीन यंत्राची मागणी केली. त्यानंतर नवीन यंत्र आणून पुन्हा मतदान सुरू करण्यात आलं. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 5 वेळा ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. 2 तासांहून अधिक काळ मतदार रांगेत वाट पाहात होते. अनेक जण कंटाळून घरी गेले. अखेर EVM मशीन सुरू झालं आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली.

Loading...

वरळीच्या निवडणूक अधिकारी सुषमा सातपुते यांनी मतदान बूथ क्रमांक 62 मध्ये मशीन खराब झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. इथे EVM मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत झाल्याची माहिती त्यांनी दिली. वरळी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती इथून निवडणूक लढवत आहे. शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही मोठी निवडणूक ठरणार आहे.

अन्य बातम्या -

पुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर

तीन पिढ्यांना सोबत घेत 102 वर्षांच्या आजीबाईंनी केलं मतदान

औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप.. वाळूजमध्ये मोबाइल शॉपीवर दगडफेक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...