नांदेडमध्ये कट्टर समर्थकांचा कहर.. EVM मशीन कोडसह फोटो FB वर व्हायरल

नांदेडमध्ये कट्टर समर्थकांचा कहर.. EVM मशीन कोडसह फोटो FB वर व्हायरल

फोटो टाकणाऱ्यांचे फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअॅप ग्रुप देखील तपासण्याचे काम सुरु आहे. फोटोवरच्या EVM मशीन आणि व्हीव्हीपॅडचा क्रमांक जुळाला की संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

  • Share this:

मुजीब शेख (प्रतिनिधी)

नांदेड, २२ एप्रिल- अमुक पक्षाला, उमेदवाराला मतदान केल्याचे फोटो व्हायरल करणाऱ्या कट्टर समर्थकांवर नांदेडमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत दोन जणांविरोधात गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. अजून २० ते २५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी मतदान झाले. त्याच दिवशी अनेकांनी मतदान करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. ठरावीक पक्षाला, उमेदवाराला मतदान केल्याचा पुरावा म्हणून, कॉंग्रेस, भाजप, बहुजन वंचीत आघाडी आणि सप-बसप आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फोटो व्हायरल केले. काहींनी तर मतदान करताना फेसबुकवरुन त्याच लाईव्ह चित्रिकरण देखील केले.

आपण किती कट्टर आणि निष्टावान असल्याचा पुरावा म्हणून कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला. मात्र, त्याचे हे शहानपण आता त्यांनाच नडणार आहे. गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना जेलमध्ये डांबण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. मतदान करताना बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅडचे जे फोटो व्हायरल झाले, त्यासोबत EVM मशीनचे कोड नंबर देखील बाहेर पडले. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने कारवाई करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार दोन जणांविरोधात गोपनियेतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो टाकणाऱ्यांचे फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअॅप ग्रुप देखील तपासण्याचे काम सुरु आहे. फोटोवरच्या EVM मशीन आणि व्हीव्हीपॅडचा क्रमांक जुळाला की संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. व्हायरल फोटो हाच भक्कम पुरावा असल्याने न्यायालयात आरोपींना शिक्षा देखील होण्याची शक्यता असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण आंबेकर यांनी माहिती दिली.

First published: April 22, 2019, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading