'त्या' नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन, एकनाथ खडसेंनी दिला गंभीर इशारा

'त्या' नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन, एकनाथ खडसेंनी दिला गंभीर इशारा

उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थीसाठी चंद्रकांत पाटील जळगावात पोहोचले आहे.

  • Share this:

जळगाव, 07 डिसेंबर : पक्षाचे अध्यक्ष अमित शहांनी जर परवानगी दिली तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन, असा थेट इशाराच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. ते भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकप्रसंगी माध्यमांशी बोलत होते.

पक्षाचे उमेदवार पराभूत होण्यावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष नेतृत्त्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कोणी काम केलं याची विश्‍लेषणवजा माहिती आणि तक्रारीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील तिढा सोडवण्यासाठी जळगावात  भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. मात्र, एकनाथ खडसे या बैठकीला पोहोचणार नाही अशी चर्चा होती. अखेर, खडसे या बैठकीला हजर झाले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पुरावे वगैरे आता प्रश्‍नच नाही. मी अस्वस्थ अथवा नाराजही नाही. गिरीशभाऊंनी सांगितले होते की, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते बाहेर, जनतेसमोर मांडा. माझ्याकडे नावानिशी सर्व पुरावे आहेत. परंतु, ही माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी अध्यक्षांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. आमच्या पक्षाची शिस्त आहे, असंही खडसे म्हणाले.

चंद्रकांत पाटलांची मध्यस्थी

उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थीसाठी चंद्रकांत पाटील जळगावात पोहोचले आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आमनेसामने आले आहे. पक्षातीलच काही नेत्यांमुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला. तसंच मुलगी रोहिणी खडसेंच्या पराभवालाही त्यांनी भाजपतील काहींना जबाबदार ठरवलंय. मात्र, खडसेंच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही रोहिणींच्या पराभवाबाबत खडसेंकडे कोणतेही पुरावे असल्यास त्यांनी ते सादर करावे, अशी मागणी गिरीश महाजनांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या