मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्याला मिळणार 2-3 खाती, पण खातेवाटपाचा मुहूर्त कधी?

शिंदे सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्याला मिळणार 2-3 खाती, पण खातेवाटपाचा मुहूर्त कधी?

शिंदे सरकार बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आता दोन दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे नाव घेत नाही.

    मुंबई, 11 ऑगस्ट : कधी होणार कधी होणार म्हणत अखेरीस 39 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण विस्तार होऊन 48 तास झाले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही.विशेष म्हणजे, प्रत्येक मंत्र्यांना प्रत्येकी दोन-तीन खात्यांचे पर्याय विचारण्यात आले आहे. ते पर्याय मंत्र्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाला पाठवले देखील आहेत. मात्र अद्याप कोणत्या मंत्र्याला कोणती खाते द्यायची हे अद्याप कळवण्यात आले नाही. शिंदे सरकार बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आता दोन दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे नाव घेत नाही. कोणते खाते कुणाला दिले जाणार, याबद्दल बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण, खातेवाटपाचा कोणताही निर्णय झाला नाही. १५ ॲागस्ट पूर्वी खाते वाटप झाल तर पालक मंत्री नेमता येईल आणि प्रत्येक जिल्हयात ते ध्वजारोहणासाठी उपस्थित राहू शकतात. त्याच प्रमाणे १७ ॲागस्टपासून राज्य विधीमंडळाच पावसाळी आधिवेशन सुरू होत आहे. (अखेर 2 दिवसांनी आठवले बाळासाहेब, शिवतीर्थावर पोहोचले शिंदे गटाचे मंत्री!) आधिवेशनापूर्वी किमान काही दिवसआधी खाते वाटप झाले तर मंत्र्यांना आपल्या विभागाचा आढावा घेता येऊ शकतो. जेणेकरून अधिवेशनात विरोधकांना उत्तर देऊ शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराला 39 दिवस लागले खाते वाटपeसाठी किती कालावधी लागणारं हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कुणी घेतली शपथ? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता राज्यात 20 मंत्री आहेत. मंगळवारी भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे यांनी शपथ घेतली, तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या