एव्हरेस्ट आला..पण, पहिल्या दिवशी सर केले शिखर, दुसऱ्या दिवशी आले हे दुखद वृत्त

एव्हरेस्ट आला..पण, पहिल्या दिवशी सर केले शिखर, दुसऱ्या दिवशी आले हे दुखद वृत्त

अकलूजचे सुपुत्र निहाल बागवान यांनी काल (गुरुवारी) एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. त्यानिमित्त सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आला. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

अकलूज, 24 मे- अकलूजचे सुपुत्र निहाल बागवान यांनी काल (गुरुवारी) एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. त्यानिमित्त सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आला. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. निहाल बागवान हे माघारी परतत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती मिळाली आहे.

'माउंट एव्हरेस्ट'वर लागलाय 'ट्रॅफिक जाम'; 200 हून अधिक गिर्यारोहक खोळंबले

सोलापुरच्या अकलूज सारख्या ग्रामीण भागात राहून गिर्यारोहणाचा छंद जोपासलेल्या निहाल बागवान या युवकाचा एव्हरेस्ट सर करण्याचं ध्येय पूर्ण करून परतताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकलूज गावात राहून एका सामान्य कुटुंबातील युवक आपलं स्वतःच शिक्षण पूर्ण करत, स्वतःचा छोटासा व्यवसाय बघत, जगातील सर्वोच्च शिखरास गवसनी घालण्याचं स्वप्न बघतो, ही गोष्ट काही सोपी नाही. 2017 साली पुन्हा त्यांनी अनेक प्रयत्न करुन निधी जमवला होता. यासाठी त्यांना अनेक जणांनी मदत आपापल्या परीने मदत करत त्यांच्या या स्वप्नाला पाठबळ दिले.

आता पुन्हा एकदा नव्या दमाने आणि तितक्याच जोशाने निहाल हा 10 एप्रिल रोजी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाला होता. निहालने यापूर्वी सह्याद्रीतील अनेक गड व घाटवाटा यशस्वीपणे पार केल्या होत्या. तसेच हिमालयातील चंद्रभागा 9 आणि स्टोक कांग्री ही शिखरे यशस्वीपणे सर केलेली होती. त्याबरोबरच गिर्यारोहणाचे अत्यंत कठीण असे प्रशिक्षण ही त्याने यशस्वीपणे पूर्ण केले होते.

पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर निहालने आता एव्हरेस्टची तयारी केली होती. तो त्याच्या साथीदारासह या मोहिमेत सहभागी झाला होता. त्याने एव्हरेस्ट शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकवला होता. ही मोहीम फत्ते करून परतताना दुसऱ्या टप्प्यावर आल्यानंतर तेथील वातावरणात बदल झाल्याने निहाल बागवान, अंजली कुलकर्णी, आणि कल्पना दास या तीन गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 27 मे ला निहालचे पार्थिव अकलूज येथे आणले जाईल, अशी माहिती निहालच्या नातेवाईकांनी दिली आहे.

मोदी त्सुनामीपुढे विरोधकांचं पानिपत, यासोबत महत्त्वाच्या इतर 18 घडमोडी

First published: May 24, 2019, 4:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading