• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सोमय्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकार बरखास्त होईल, भाजप नेत्याचा इशारा

सोमय्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर सरकार बरखास्त होईल, भाजप नेत्याचा इशारा

'कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे'

'कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे'

'कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे'

  • Share this:
पुणे, 19 सप्टेंबर : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अखेर कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ( hasan mushrif)   यांच्या समर्थकांनी सोमय्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे.  उद्या किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल, असा इशाराच माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी दिला. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले असताना, त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ganpati visarjan 2021 : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 2 तरुण बुडाले दरम्यान, किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी घरीच स्थानबद्ध केलं होतं. पण, त्यानंतर बंदोबस्त हटवल्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले. महालक्ष्मी एक्स्प्रेस रवाना झाली. कल्याण रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सोमय्यांना पोलीस अडवतील अशी शक्यता होती. पण, तसंही घडलं नाही. त्यामुळे त्यांना पुणे स्थानकावर अडवण्याची चिन्ह आहे. सासरेबुवा झालेतरी उदित नारायणांची ती सवय सुटेना; सूनेसमोरच... दुसरीकडे कोल्हापुर जिल्ह्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे. 20 सप्टेंबरला पहाटे 5 ते 21 सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. सोमय्यांना सुद्धा याबद्दल नोटीस बजावली आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्ताने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या जर कोल्हापुरात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे पोलिसांवर ताण पडण्याची चिन्ह आहे.
Published by:sachin Salve
First published: