Home /News /maharashtra /

'मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही' रायगडावरून संभाजीराजे कडाडले

'मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही' रायगडावरून संभाजीराजे कडाडले

मी काही राजकारणी नाही, राजकारण करणार नाही, मराठा समाजाला वेठीस धरणार नाही, धरायचंही नाही, जर काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो

    रायगड, 06 जून: 'लढाई आपल्यामध्येच कशाला करायची, मी काही राजकारणी नाही, राजकारण करणार नाही, मराठा समाजाला वेठीस धरणार नाही, धरायचंही नाही, जर काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, दिशाभूल करण्याचं रक्त आमच्यात नाही, असं म्हणत खासदार संभाजीराजे (sambhaji raje chhatrapati) यांनी रायगडावरून मराठा समाजाला आश्वासन दिलं. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जनाच राजेंनी केली. रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा (shivrajyabhishek sohala) संपन्न झाला. यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. अशोक सराफ यांनी का नाकारले गेस्ट रोल? सांगितलं चकित करणारं कारण मराठा आरक्षणाचा आपणा लढा देत आहोत. काही लोकं नाराज झाले तरी चालतील, पण समाजाला वेी.ठीस धरणार नाही, कुणाचाही दिशाभूल करणार नाही. पण, आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे. आता कितीही नाराज झाले तरी चालतील, शिवाजीराजे यांनी जे समाजासाठी कार्य केले होते, तेच आपल्याला पुढे न्यायचे आहे. पण आता कोरोनाचं संकट असल्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं संभाजीराजे म्हणाले. रक्ताची नाती जीवावर उठली; कोल्हापूरात मुलाच्या मदतीनं सख्ख्या भावाचा काढला काटा मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. नेते आणि मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही  खेळ सुरू केला आहे, मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.
    छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे कोल्हापूरमधून 16 जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या