• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 26 वर्षे नोकरी अन् मानधन 1700 रुपये; शिक्षिकेची करुण कहाणी वाचून पाणवतील डोळे

26 वर्षे नोकरी अन् मानधन 1700 रुपये; शिक्षिकेची करुण कहाणी वाचून पाणवतील डोळे

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

शशिकला शरद येवले (Shashikala Sharad Yewale) असं संबंधित शिक्षिकेचं नाव असून त्या उंबरखेड येथील रामराव जिभाऊ माध्यमिक आणि बी बी महाले उच्च माध्यमिक विद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या शिक्षिका आहेत.

 • Share this:
  जळगाव, 03 ऑक्टोबर: देशात सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेक शिक्षक-शिक्षिकांच्या पगारात गल्लेलठ्ठ वाढ झाली. अनेकांचे पगार दोन-अडीच लाख प्रतिमाह पेक्षा अधिक झाले. पण जळगाव जिल्ह्यातील उंबरखेड येथील एका शिक्षिकेला मात्र गेल्या सव्वीस वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर नोकरी करावी लागली आहे. संबंधित शिक्षिका अलीकडेच 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. सेवानिवृत्त होत असताना त्यांना केवळ 1700 रुपये मानधन मिळत होतं. त्यांची ही करुण कहाणी ऐकून अनेकांचे डोळे पाणवले आहेत. शशिकला शरद येवले (Shashikala Sharad Yewale) असं संबंधित शिक्षिकेचं नाव असून त्या उंबरखेड येथील रामराव जिभाऊ माध्यमिक आणि बी बी महाले उच्च माध्यमिक विद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या शिक्षिका आहेत. अकरावी आणि बारावीचे प्रत्येकी दोन वर्ग त्यांच्याकडे शिकवण्यासाठी होते. एम. ए. एम. फिल. ची डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या शशिकला यांना 1995 साली प्राध्यापकाची नोकरी मिळाली होती. हेही वाचा-बापाच्या कृत्याची चिमुकल्याला मिळाली शिक्षा; अखेर कृष्णा नदीत सापडला मृतदेह प्राध्यापकाची नोकरी मिळाल्याने घरातील सर्वजण खूप खूश होते. येवले यांच्या नोकरीची सुरुवात वीस रुपये तासिकेप्रमाणे झाली होती. म्हणजे 1995 साली त्यांना 700 रुपये मासिक मानधन मिळत होतं. त्यानंतर बरीच वर्षे त्यांना एवढंच मानधन मिळत राहिलं. दरम्यान देशात सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांना तासिकेप्रमाणे वीस रुपयांऐवजी 70 रुपये मिळू लागले. सलग 26 वर्षे नोकरी करूनही एका उच्च शिक्षित शिक्षिकेला केवळ 1700 रुपये मानधन मिळत होतं. हेही वाचा-100 रुपयांसाठी मावशीने केलेला अपमान जिव्हारी; पुण्यातील तरुणाचा हृदयद्रावक शेवट शशिकला येवले या अलीकडेच 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी शशिकला यांच्या पतीचं निधन झालं आहे. सध्या त्यांच्या घरी लग्नाच्या दोन मुली आणि सासू असा परिवार आहे. 26 वर्षात हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्याचं भविष्य प्रकाशमान करणाऱ्या या शिक्षिकेचं वर्तमान मात्र अंधारमय झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: