औरंगाबादेत घोड्यांना दयामरण, यामुळे पशुसंवर्धन विभागाने घेतला कठोर निर्णय

औरंगाबादेत घोड्यांना दयामरण, यामुळे पशुसंवर्धन विभागाने घेतला कठोर निर्णय

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना मराठवाड्यातील औरंगाबादेत ही एका दुर्मिळ आजारामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

  • Share this:

औरंगाबाद,26 फेब्रुवारी:चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना मराठवाड्यातील औरंगाबादेत ही एका दुर्मिळ आजारामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.'ग्लॅडर्स' असे या आजाराचे नाव असून तो संसर्गजन्य आहे. 'ग्लॅडर्स' आजार घोड्यांमध्ये आढळून आला आहे. 'ग्लॅडर्स'ने त्रस्त असलेल्या दोन घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. शहरातील कांचनवाडी भागातील या दोन्ही घोड्यांना गुरुवारी सायंकाळपर्यंत दयामरण दिले जाणार आहे. घोड्यांना दयामरण दिले जाण्याची औरंगाबादमधील ही पहिलीच घटना आहे.

औरंगाबाद शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या कांचनवाडीमध्ये ही दोन घोडे जनार्दन तांबे यांच्या मालकीची आहेत. जनार्दन तांबे हे लग्न समारंभ, मिरवणुका आदींसाठी हे व्यावसायिक घोडे पुरवतात. या दोन्ही घोड्यांना 'ग्लॅडर्स' या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. आजारामुळे घोड्यांना शरीरावर मोठं-मोठी फोड आली आहेत. फोड फुटल्यानंतर त्यातून पू आणि रक्त बाहेर पडते. या रक्त आणि पू मुळेच ग्लॅडर्सचा विषाणू इतर प्राण्यांच्या किंवा माणसांच्या शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्लॅडर्स आजार पूर्णपणे संसर्गजन्य आजार आहे. राज्य सरकार आणि महापालिका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीची बैठक घेऊन दयामरणाचा निर्णय घेण्यात आला. घोड्यांना होणारा हा ग्लॅडर्स आजार गुजरातमधून आल्याची माहिती आहे.

नॉर्मल डिलिव्हरीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची साथ, प्रसूती वेदना कमी करणार

जनार्दन तांबे यांच्या दोन्ही घोड्यांची प्रकृती दिवसेंदिवस खातावत जात असल्याने पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एस. कांबळे, पशूसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी, महापालिकेच्या पशूसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. बी.एस. नाईकवाडे, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. राठोडकर, क्रांती चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत त्या दोन्हीही घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. घोड्यांना दयामरण दिल्यानंतर त्यांना पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या शेजारील जागेत त्यांना पुरले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बारीक व्हायचंय मग पोटभर नाश्ता आणि जेवण कमी करा

First published: February 26, 2020, 8:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading