मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Child Covid Center : तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक? या जिल्हात उभारलं कोविड सेंटर

Child Covid Center : तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक? या जिल्हात उभारलं कोविड सेंटर

कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने अकोल्यातील बाल कोविड योद्धा समितीच्या वतीने भरतीया भवन, जुने जिव्हाळा वृद्ध आश्रमाच्या परिसरात बाल कोविड सेंटर (Child Covid Center) उभारण्यात आले आहे.

कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने अकोल्यातील बाल कोविड योद्धा समितीच्या वतीने भरतीया भवन, जुने जिव्हाळा वृद्ध आश्रमाच्या परिसरात बाल कोविड सेंटर (Child Covid Center) उभारण्यात आले आहे.

कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने अकोल्यातील बाल कोविड योद्धा समितीच्या वतीने भरतीया भवन, जुने जिव्हाळा वृद्ध आश्रमाच्या परिसरात बाल कोविड सेंटर (Child Covid Center) उभारण्यात आले आहे.

अकोला, 09 जून : कोरोनाची पहिली लाट आली आणि हाहाकार माजला नंतर दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाणही वाढू लागल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आता तिसरी (Corona Third Wave) लाट येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट लहान मुलांसाठी (Corona Impact On Child) धोकादायक ठरू शकते, असे सांगितलं जातंय. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील बाल कोविड योद्धा समितीच्या वतीने भरतीया भवन, जुने जिव्हाळा वृद्ध आश्रमाच्या परिसरात बाल कोविड सेंटर (Child Covid Center) उभारण्यात आले आहे.

हे 20 खाटांचे कोविड केअर सेंटर नि:शुल्क राहणार असून लहान मुलांच्या दृष्टीने याची रचना आणि सजावट केली जात आहे. लहान मुलांना हे सेंटर दवाखाण्यासारखं वाटू नये म्हणून या ठिकाणी मुलांचे आवडते वेगवेगळे कार्टून्स भिंतीवर काढण्यात आले आहेत. ज्यामुळं मुलांचा उपचारही होऊ शकेल आणि लहान मुलांना खेळल्या-बागडल्यासारखेही वाटेल. संभाव्य लाट समजा आलीच नाही तर याचा उपायही या समितीनं शोधून ठेवलाय. जर ही लाट आलीच नाही तर, बालगृहातील (अनाथालय) मुलांना आजारी पडल्यास उपचारासाठी वापरलं जाईल आणि बालगृहामध्ये काही नवीन मुलांचा प्रवेश करतेवेळी त्यांना या ठिकाणी विलगीकरणात ठेवलं जाईल.

हे वाचा - VIDEO : पावसाचं महाभयंकर रुप, पाहता पाहता पूल गेला वाहून; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम

बाल कोविड योद्धा समितीच्या पुढाकाराने सुरू केलेला हा उपक्रम तिसऱ्या लाटेच्या काळात उपयोगी आहेच. तसेच इतरांनीही प्रेरणा घेण्यासारखाही आहे. कोरोनाची कदाचित तिसरी लाट आलीच तर ऐनवेळी होणारी धावपळ रोखून लहान मुलांना योग्य उपचार देण्याची येथे सोय केली आहे.

बाल कोविड आयसोलेशन व काँन्सिलींग सेंटरमधील सुविधा

1) तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामध्ये लहान मुलांकरिता कोविड सेंटर असेल

2) विविध प्रकारचे व्यक्तिगत खेळता येणारे गेम त्यांना दिले जातील

3 ) योगा करवून घेणारी टीम उपलब्ध असेल

4) लहान मुलांची विशेष काळजी घेणाऱ्या केअर टेकर महिला उपस्थित राहतील

5) नास्ता आणि जेवणातून मुलांना सकस अहार मुलांना दिला जाईल

6) तज्ञ व्यक्तींकडून काँसिलिंग करून मुलाचे मनोधैर्य वाढवण्यात येईल

7) संगीत तज्ज्ञांच गायन दररोज सकाळी ठेवण्यात येईल

8) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार करण्यात येतील, त्याकरिता पेडियट्रिक व फिजीशीयन डॉक्टर उपलब्ध असतील

9) तज्ज्ञ नर्सिंग स्टाफ उपलब्ध असेल, बाल स्नेही वातावरण असेल

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus