गाडीतून अतिरिक्त धूर निघाल्याने रामदास कदम भडकले; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

गाडीतून अतिरिक्त धूर निघाल्याने रामदास कदम भडकले; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता.

  • Share this:

20 एप्रिल : पर्यावरण मंत्री रामदास कदम हे सध्या पर्यावरणामुळेच संतप्त झाले आहेत. रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी थेट पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कदम यांच्या एसकॉटमध्ये एमएच २० एडी १५१५ क्रमांकाची गाडी होती. त्या गाडीतून मोठ्या प्रमाणावर काळ्या रंगाचा धूर येत होता.

या धुरामुळे पर्यावरणाला तर त्रास होतच होता पण त्याचा त्रास रामदास कदम यांनाही झाला आणि यावरच संतप्त येऊन त्यांनी थेट मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सुभेदारी विश्रामगृहात पोहचल्यावर त्यांनी पोलिसांना चांगलंच फैलावर घेतले.

 

First Published: Apr 20, 2018 08:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading