मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गावकऱ्यांनो काळजी घ्या! ग्रामीण भागात Mucormycosisचा शिरकाव, वाशिममध्ये महिलेचा मृत्यू

गावकऱ्यांनो काळजी घ्या! ग्रामीण भागात Mucormycosisचा शिरकाव, वाशिममध्ये महिलेचा मृत्यू

नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळ्याला लाली येते. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो. परंतु, दुर्लक्ष केल्यास...

नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळ्याला लाली येते. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो. परंतु, दुर्लक्ष केल्यास...

नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळ्याला लाली येते. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो. परंतु, दुर्लक्ष केल्यास...

  • Published by:  sachin Salve

किशोर गोमासे,प्रतिनिधी

वाशिम, 13 मे : महाराष्ट्रात कोरोनाची (Corona) आता तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. अशातच आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis ) नावाच्या नव्या आजाराने डोके वर काढले आहे. शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात सुद्धा म्युकरमायकोसिसने शिरकाव केला आहे. वाशिममध्ये (Washim) कोविड पॉझिटिव्ह (Covid positive) असलेल्या एका 62 वर्षीय महिलेचा म्युकरमायकोसिस झाल्यानं मृत्यू झाल्याची घटना वाशिममध्ये समोर आली आहे. तर, मनमाड (Manmad), जुन्नरमध्येही (Junner) रुग्ण आढळून आले आहे.

वाशिम जिल्ह्याच्या मोप येथील एक 62 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं तिला लेडी हार्डिंगमध्ये 29 एप्रिल रोजी भरती करण्यात आलं होतं. तिचा CT स्कोअर 22 असल्यानं तिच्यावर कोरोनाचा उपचार सुरू होता. दरम्यान, तिला म्युकरमायकोसिस हा आजार जडल्याचं निदान झालं होतं.11 मे रोजी तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानं पुढील उपचारसाठी अकोला इथं पाठविण्यात येणार होतं. मात्र 12 मेच्या पहाटे त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी Good News! वार्षिक 6000 च नाही तर मिळतील दरमहा 3000, वाचा सविस्तर

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच म्युकरमायकोसिस या आजाराने महिलेचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांसह आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

दरम्यान, नाशिकच्या ग्रामीण भागात ही म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा शिरकाव झाला आहे. येवल्यात चार तर लासलगावमध्ये 6 असे 10 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. येवल्याचे नेत्ररोग तज्ञ डॉ. अविदत्त निरगुडे यांनी या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील नेत्ररोग तज्ञांकडे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला आहे.

पुणे ग्रामीणमध्ये आढळला  म्युकोरमायकोसिसचा पहिला रूग्ण

तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धनगरवाडी गावात 65 वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन दिवसांनी बुरशीजन्य आजार म्युकोरमायकोसिसचा संसर्ग झाल्याची घटना समोर झाली आहे. बुधवारी सकाळी नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या अथर्व नेत्रालय नारायणगाव येथे  सदर महिला डोळे तपासणीसाठी आली असता ही बाब निदर्शनास आली आहे.

गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा दाखल

कोरोनानंतर मधुमेह असणाऱ्यांना या आजाराची लागण होते. यात नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळ्याला लाली येते. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो. परंतु, दुर्लक्ष केल्यास या आजाराची गंभीरता वाढत जाऊन ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचतो व रुग्णाची परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे कोरोना नंतर न डोळे व नाका संबंधी काही तक्रारी आढळल्यास तात्काळ संबंधित तज्ञांना दाखवणे गरजेचे आहे, असे डॉक्टर मनोहर डोळे नेत्र रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संदीप डोळे यांनी सांगितले. या आजारात घाबरून न जाता प्रथमोपचार करणे गरजेचे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाने अगोदरच हाहाकार माजवला असतानाच म्युकोरमायकोसिस नावाच्या बुरशीजन्य आजाराचे आगमनही आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाले आहे त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

First published: