Home /News /maharashtra /

हातपाय बांधत तोंडात बोळे कोंबले; लसीकरण पथक असल्याचं सांगत वयोवृद्धांना भरदिवसा लुटलं

हातपाय बांधत तोंडात बोळे कोंबले; लसीकरण पथक असल्याचं सांगत वयोवृद्धांना भरदिवसा लुटलं

दरोडेखोरांनी लसीकरण पथक (Vaccination team) असल्याचं सांगत दिवसाढवळ्या एका घरावर दरोडा (Robbery) टाकला आहे. आरोपींनी घरातील वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या नातीला दोरीनं बाधून त्यांना मारहाण (tied hands and feet and beat) केली आहे.

    अकोट, 01 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोरोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासनाकडून सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. पण अकोट येथील काही दरोडेखोरांनी लसीकरण पथक (Vaccination team) असल्याचं सांगत दिवसाढवळ्या एका घरावर दरोडा (Robbery) टाकला आहे. आरोपींनी घरातील वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या नातीला दोरीनं बाधून त्यांना मारहाण (tied hands and feet and beat) केली आहे. दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी घराला बाहेरून कडी लावून धूम ठोकली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना अकोट येथील बुधवार वेस परिसरात घडली आहे. येथील एक व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या घरात मंगळवारी तीन ते चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. या दरोड्यात आरोपींनी घरातील वयोवृद्धांना मारहाण करत घरातील मोबाईलसह काही किमती ऐवज लंपास केला आहे. यानंतर आरोपींनी घराला बाहेरून कडी लावून घटनास्थळावरून पलायन केलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. हेही वाचा-मुंबई: डोक्यावर कुटुंबाचं ओझं अन् मनात नैराश्य;20वर्षीय हतबल तरुणीनं संपवलं जीवन नेमकं काय घडलं? मंगळवारी दुपारच्या सुमारास तीन ते चार जणांनी बुधवार वेस परिसरातील व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. यावेळी घरात सेजपाल यांचे वयोवृद्ध आई वडील आणि मुलगी असे तिघेच होते. दरम्यान दरवाजा ठोठावल्याचा आवाज येताच मुलगी देलिशा हिने दरवाजा उघडला. दाराबाहेर उभ्या असणाऱ्या तिघांनी आपण लसीकरण पथकाचे कर्मचारी असल्याचा दावा केला. पण देलिशानं त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. हेही वाचा-सेम टीशर्ट घातल्यानं निष्पाप तरुणाचा गेला जीव; भयंकर कृत्यानं मुंबई हादरली यावेळी दरोडेखोरांसोबत असणाऱ्या महिलेनं दरवाजा लोटत घरात प्रवेश केला. कोणालाही काही कळेपर्यंत आरोपींनी देलिशासह तिच्या आजी- आजोबांना बंदी बनवलं. त्याचे हातपाय दोरीने बांधले. तसेच ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंडात बोळे कोंबत चिकटपट्या लावला. यानंतर आरोपींनी तिघांना मारहाण करत घरातील मोबाइलसह अन्य किमती ऐवज लुटला. यानंतर दरोडेखोरांनी घराला बाहेरून कडी लावून घटनास्थळावरून पसार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Robbery

    पुढील बातम्या